AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran US Ceasefire : पाकिस्तान कितीही नाचला तरी त्यांच्या देशात इराण-अमेरिका मध्यस्थीची बैठक का होऊ शकत नाही? 3 पॉइंटमध्ये समजून घ्या

Iran US Ceasefire : मध्य पूर्वेतील भीषण युद्ध कधी थांबणार? याकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलं आहे. कारण यामुळे तेल संकट दिवसेंदिवस गंभीर बनत चाललं आहे. इराण-अमेरिकेत शांतता बैठक घडवून आणण्यासाठी पाकिस्तान मध्यस्थीचे प्रयत्न करत आहे. पण पाकिस्तानची ही इच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. का ते समजून घ्या.

Iran US Ceasefire : पाकिस्तान कितीही नाचला तरी त्यांच्या देशात इराण-अमेरिका मध्यस्थीची बैठक का होऊ शकत नाही? 3 पॉइंटमध्ये  समजून घ्या
Iran US Ceasefire Meeting
| Updated on: Mar 25, 2026 | 10:25 PM
Share

पाकिस्तानला इस्लामाबाद मध्ये अमेरिका-इराण दरम्यान शांतता करारासाठी बैठक आयोजित करण्याची इच्छा आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना असा प्रस्ताव दिला आहे. इराणचा जुना रेकॉर्ड आणि नवीन भूमिका पाहता इस्लामबादमध्ये बैठक होण्याची शक्यता नाहीय. पाकिस्तान इराणचा शेजारी देश आहे. दोन्ही देशांमध्ये 901 किलोमीटरची सीमा आहे.

अमेरिकी आउटलेट एक्सियोसनुसार, इस्लाबादमध्ये बैठक व्हावी अशी अमेरिकेची इच्छा आहे. अमेरिकेने यासाठी इराणला पाकिस्तानच्या माध्यमातून 15 अटींचा शांती प्रस्ताव पाठवला आहे. याच प्रस्तावाच्या आधारावर अमेरिकेला इराणसोबत चर्चा करायची आहे.

पाकिस्तानात बैठक न होण्यामागची तीन कारणं काय?

1 अमेरिका आणि इराणमध्ये मागच्या वर्षभरात आतापर्यंत दोनवेळा शांतता बैठकीचा प्रयत्न झाला आहे. एप्रिल 2025 मध्ये पहिल्यांदा दोन्ही देशांचे दूत बैठकीसाठी एकत्र बसले. त्यावेळी अमेरिकेने वियनामध्ये बोलणी करण्याचं स्थान ठरवलं होतं. पण इराणने त्यात बदल केला. ओमानच्या मस्कतमध्ये ही बैठक झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये दोन्ही देशांमध्ये नव्याने चर्चा सुरु झाली. अमेरिकेने त्यावेळी तुर्कीमध्ये बैठकीचा स्थान ठरवलं होतं. पण इराणने पुन्हा ओमानची निवड केली. ओमान आणि जिनेवा येथे दोन्ही देशांमध्ये बैठक झाली.

हा रेकॉर्ड पाहता इराण कदाचितच इस्लामाबादमध्ये बैठकीला होकार देईल. कारण इस्लामाबादचा प्रस्ताव अमेरिकेने दिला आहे.

2 न्यूयॉर्क पोस्टनुसार इराण सरकारला चर्चेची ऑफर एक जाळं वाटतेय. चर्चेच्या नावाखाली त्यांचा एकमेव मोठा कट्टरपंथीय नेता एमबी गालिबफची हत्या होईल ही भिती आहे. कारण अमेरिकेने गालिबफलाच भेटायचं आहे असं म्हटलय. गालिबफच चर्चा फायनल करु शकतात असं अमेरिकेचं मत आहे.

हत्येची भिती असल्यामुळे इराण आपल्या बड्या नेत्यांना चर्चेसाठी कधीही पाकिस्तान पाठवणार नाही. कारण पाकिस्तानात आता चांगली स्थिती नाहीय. 2025 साली जगातील सर्वाधिक दहशतवादी हल्ले पाकिस्तानात झाले आहेत.

3 पाकिस्तान आणि इराणमध्ये कूटनितीक दृष्टीने सर्वकाही आलबेल नाहीय. पाकिस्तानने मागच्यावर्षी इराणचा कट्टर शत्रू सौदी अरेबियासोबत संरक्षण करार केला. या करारानुसार सौदी अरेबिया इराण विरोधात युद्धासाठी मैदानात उतरला, तर पाकिस्तानलाही सौदीच्या बाजूने उतरावं लागेल.

मागच्या 24 तासात पाकिस्तानचे पंतप्रधान आणि उप पंतप्रधानांनी इराणच्या वरिष्ठ नेत्यांसोबत 3 वेळा फोनवर चर्चा केली. मात्र, तरीही इराणने हॉमुर्झमधून पाकिस्तानी जहाजाला जाण्याची परवानगी दिली नाही. यूएईवरुन येणारं जहाज सेलनला इराणने परत पाठवून दिलं. पाकिस्तान आणि इराणमध्ये कूटनितीक संबंध किती खराब आहेत हे यावरुन दिसतं.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?