AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऐन इराण युद्धात मणिपूर-मिझोरमच्या या लोकांची इस्रायलला रवानगी, थेट तेल अवीवमध्ये एण्ट्री ?

मध्य पूर्वेत एकीकडे तणाव सुरु असताना भारतातून २४० लोक इस्रायलला पोहचले आहेत. या लोकांना मणिपूर आणि मिझोरममधून इस्रायलला एका मिशन अंतर्गत नेण्यात आले आहे.

ऐन इराण युद्धात मणिपूर-मिझोरमच्या या लोकांची इस्रायलला रवानगी, थेट तेल अवीवमध्ये एण्ट्री ?
Bnei Menashe
| Updated on: Apr 28, 2026 | 3:13 PM
Share

अमेरिका आणि इराणमध्ये भलेही सीजफायर झाली असेल तरी मध्य पूर्वेतील स्थिती अद्यापही धोकादायक आहे. होर्मुझ स्ट्रेटवर इराण आणि अमेरिका सातत्याने टेहळणी करत आहेत. दुसरीकडे इस्रायल आणि लेबनॉनची धुमश्चक्री सुरु आहे. या दरम्यान भारतातील मणिपूर आणि मिझोरमचे २४९ लोक इस्रायलला पोहचले आहेत. हे लोक स्वत:ला इस्रायलच्या लुप्त झालेल्या १० जमातींपैकी एक मानतात. हे मणिपूर आणि मिझोरमचे बनेई मेनाशे समुदायातील सदस्य आहेत.

मेनाशे जमातीचे वंशज

हा इस्रायलच्या सरकारद्वारा समुदायातील सदस्यांना दुसरी जागी पाठवण्याची पहिली बॅच होती. बेनई मेनाशे हे मणिपूर आणि मिझोरमच्या मिझो आणि कुकी आदीवासी समुदायांपैकी एक ज्यू समुदाय आहे. जे स्वत:ला मेनाशे जमातीचे वंशज मानतात. या समुदायातील सुमारे ७,००० सदस्य मणिपूर आणि मिझोरममध्ये राहातात. परंतू काही लोक गेल्या काही वर्षात आधीच इस्रायलला गेले आहेत.

इस्रायलला पाठवूणक झाली

गेल्या काही वर्षात ४,००० बनेई मेनाशेंना इस्रायलला पाठवण्यात मदत केल्याचे शावेई इस्रायलने म्हटले आहे. २००६ मध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले होते. तेव्हा समुदायाचे २१३ सदस्य मिझोरममधून मायग्रेट झाले होते. यानंतर साल २००७ नंतर मणिपूरातून २३३ आणखी लोक स्थलांतरीत झाले होते. तर २०१८ मध्ये ४०० हून जास्त लोक मायग्रेट झाले होते.

स्वतंत्र बजेट राखण्याची घोषणा –

या बॅचला इस्रायली सरकारच्या एका ऑपरेशन अंतर्गत इस्रायलला शिफ्ट केले जात आहे. हे पाऊल इस्रायल केबिनेटने गेल्या नोव्हेंबरमध्ये उचलले होते. तेव्हा त्यांची फ्लाईट, राहाण्याचे ठिकाण, कन्व्हर्जन क्लास, हिब्रु लेसन आणि २०३० च्या अखेरपर्यंत समुदायाच्या सर्व सदस्यांना ट्रान्सपोर्ट करण्याच्या खर्चासह कव्हर करण्यासाठी एक स्पेशल बजेट राखण्याची घोषणा केली होती.

मेनाशे सदस्याने दिला दुजोरा

इंडियन एक्सप्रेसमधील एका बातमीनुसार, इस्रायली कायद्यानुसार बेनेई मेनाशे यांना ज्यू मानले जात नाही आणि त्यामुळे, त्यांच्या इस्रायलमधील स्थलांतरासाठी विशेष परवानगीची आवश्यकता होती. इस्रायलमधील बेनेई मेनाशे संघटना, देगेल मेनाशेच्या एका सदस्याने या सदस्यांच्या आगमनाला दुजोरा दिला आहे.

इस्रायलमध्ये आणखी लोक येणार

या नवीन स्थलांतरितांना उत्तर इस्रायलच्या विविध भागांमध्ये, उदा. नोफ हागालिल आणि किर्यात याम येथे वसवले जाणार आहे. देगेल मेनाशेच्या एका निवेदनात म्हटले आहे, “ही तर केवळ सुरुवात आहे; येत्या काही आठवड्यांत आणखी दोन विमानांमधून एकूण ६०० लोक येण्याची अपेक्षा आहे. यानंतर, या वर्षाच्या अखेरीस आणखी ६०० स्थलांतरित येण्याची अपेक्षा आहे आणि ही मोहीम २०३० पर्यंत सुरू राहील.”

Follow Us
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी