AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराणच्या डोक्यातही नाही ते इस्रायलनं केलं, अणुशास्त्रज्ञांना मारण्यासाठी AI चा वापर, मोसादचा मोठा गेम!

Israel And Iran War Update : इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता चांगलेच पेटले आहे. इस्रायलने इराणवर हल्ला करण्यासाठी आता एआयचा वापर केला आहे.

इराणच्या डोक्यातही नाही ते इस्रायलनं केलं, अणुशास्त्रज्ञांना मारण्यासाठी AI चा वापर, मोसादचा मोठा गेम!
benjamin netanyahu AND Ayatollah Khamenei
| Updated on: Jun 17, 2025 | 9:56 PM
Share

Israel And Iran War : इस्रायल आणि इराण यांच्या युद्धाचा संपूर्ण जगाने धसका घेतला आहे. इस्रायलने इराणमधूल अणूउर्जा केंद्रांच्या ठिकाणावर हल्ले केल्यानंतर या युद्धाला आणखी भीषण रुप आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इस्रायली सैन्य हा हल्ला करण्यासाठी योजना आखत होतं. हा हल्ला आता इस्रायली गुप्तहेर आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून करण्यात आल्याचं आता समोर आलं आहे. या हल्ल्याच्या माध्यमातून इस्रायलने इराणच्या अनेक महत्त्वपूर्ण ठिकाणांना लक्ष्य केलं होतं. हा हल्ला करताना इस्रायलने अगोदर इराणच्या एअर डिफेन्स सिस्टिमला नेस्तनाबूत केलं. त्यानंतर इराणच्या अनेक बड्या लष्करी अधिकाऱ्यांना मारण्यात आल्याचं आता समोर आलंय.

अणुउर्जा केंद्रांवर हल्ला करण्यासाठी इस्रायलने काय काय केलं?

मोसादच्या माजी रिसर्च डायरेक्टर सिमा शाई तसेच इस्रायलचे गुप्तचर आणि सैन्य अधिकाऱ्यांशी बातचित करून रॉयटर्स या वृत्तसंस्थेने एक वृत्त प्रकाशित केले आहे. या वृत्तानुसार इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर इराणच्या अणुउर्जा केंद्रांवर हल्ला करण्यासाठी इस्रायलने काय काय केलं? याची माहिती दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा हल्ला करण्यासाठी योजना आखली जात होती, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली आहे. जोपर्यंत अमेरिकेशी आमची चर्चा होत नाही, तोपर्यंत इस्रायल आमच्यावर हल्ला करणार नाही, असे इराणला वाटले होते. पण इराणचा हा तर्क चुकीचा निघाला आहे.

ऑपरेशन रायझिंग लायन कसे पार पडले?

अमेरिका आणि इराण यांच्यात 15 जून रोजी अणुकार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी एक बैठक होणार होती. याच्या दोन दिवसांआधीच नेतान्याहू यांनी ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायली सैन्याला इराणवर हल्ला करण्यास परवानगी दिली होती. डोनाल्ट ड्रम्प यांनादेखील या बाबीची कल्पना होती, असे सांगितले जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून या ऑपरेशनवर काम चालू होते.

एआयच्या माध्यमातून टार्गेट निवडले.

या ऑपरेशनअंतर्गत टार्गेटची निवड करण्यासाठी मोसाद या इस्रायलच्या गुप्तचर संस्थेने एआयची मदत घेतली. डेटा प्रोसेस करून इस्रायलच्या कोणत्या ठिकाणांवर हल्ला करता येईल, हे ठरवले. हल्ला होणार त्या वेळी इराणचे लष्करी अधिकारी, वैज्ञानिक नेमके कुठे असतील याचा अंदाज लावण्यात आला. इस्रायलच्या या हल्ल्यात जनरल हुसैन सलामी (रव्हॉल्यूशनरी गार्डचे प्रमुख), जनरल मोहम्मद बाघेरी (इराणी सेनेचे चीफ ऑफ स्टाफ), मिसाईल कार्यक्रम प्रमुख यांच्यासह इराणच्या लष्करातील प्रमुख आठ अधिकारी यात मारले गेले.

दरम्यान, आता इस्रायलने इराणवर हल्ला करण्यासाठी एआयचा वापर केल्यानंतर आता युद्धाची नीती बदलली आहे, हे स्पष्ट होतंय. त्यामुळे आता भविष्यात इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा
तोच पैसा, तेच आकडे अन् तशीच मशीन सेट...राऊतांचा महायुतीवर थेट निशाणा.
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का
कोकणात राणे बंधूंच्या लढतीत निलेश राणेंची सरशी तर चव्हाणांना धक्का.
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया
जिल्हा कोणाच्या मागे ते...दादांची नगर परिषदांच्या निकालावर प्रतिक्रिया.
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया
BJP ची सेंच्युरी, सेनेची हाफ सेंच्युरी...शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया.
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा
मोहळमध्ये शिंदे सेनेचा सर्वात कमी वयाचा उमेदवारानं फडकवला झेंडा.
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार
देवाभाऊंची जादू कायम, स्थानिक निवडणुकीत भाजपचा विजय, महायुती 200 पार.
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा
थोरात मामा-भाचे जोडीनं विजय खेचून आणला, संगमनेरमध्ये काँग्रेसची हवा.
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का
महाडमध्ये गोगावलेंनी गड राखला, दादांच्या राष्ट्रवादीच्या तटकरेना धक्का.
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा...
परळीच्या विजयावर धनंजय मुंडे म्हणाले, बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा....
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी
नितेश राणेंना धक्का, निलेश राणेंच्या पाठिंब्यानं स्थानिक आघाडीचा विजयी.