AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रियलमी P4r 5G स्मार्टफोन 8000mAh बॅटरी आणि 14GB व्हर्च्युअल रॅमसह झाला लाँच

तुम्ही जर 20 हजार ते 25 हजार रुपयांच्या बजेटमध्ये नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या किंमत श्रेणीमध्ये नवीन रियलमी P4r 5G स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. हा फोन 8000 mAh बॅटरी आणि VC कूलिंग सिस्टीम यांसारख्या वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. चला तर मग या फोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊयात.

रियलमी P4r 5G स्मार्टफोन 8000mAh बॅटरी आणि 14GB व्हर्च्युअल रॅमसह झाला लाँच
realme phoneImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 10, 2026 | 7:23 PM
Share

तुम्हाला जर नवीन स्मार्टफोन खरेदी करायचला असेल आणि त्यात तुमचा बजेट रेंज जर 20 हजार ते 25 हजार रूपयांच्या आसपास असल्यास तुम्ही रियलमी कंपनीचा एक उत्तम नुकताच लाँच झालेला फोन खरेदी करू शकता. तर रियलमी कंपनीने 8000 mAh बॅटरी असलेला हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास या फोनमध्ये 45 वॅट फास्ट चार्जिंग, HD+ रिझोल्यूशन डिस्प्ले, 50 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सर आहे. हा फोन कंपनीच्या P सीरीजचा एक भाग आहे आणि ही सीरीज कंपनीच्या बॅटरीवर केंद्रित आहे. यापूर्वी याच सीरीजमध्ये रियलमी P4 पॉवर देखील लाँच करण्यात आला होता, ज्यामध्ये 10,001 mAh बॅटरी आहे. या फोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP65 रेटिंग मिळाले आहे. याशिवाय फोन थंड ठेवण्यासाठी एअरफ्लो VC कूलिंग सिस्टीम देण्यात आली आहे. चला तर मग आजच्या लेखात आपण या फोनची किंमत आणि जबरदस्त फिचर्स जाणून घेऊयात.

भारतात Realme P4r 5G ची किंमत

रियलमी स्मार्टफोनची किंमत 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 18 हजार 999 रूपये इतकी आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 20 हजार 999 रूपये आणि 6GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 22 हजार 999 आहे. तथापि हे व्हेरिएंट्स 16 हजार 999 रूपये 18 हजार 999 रूपये आणि 20 हजार 999 रूपये या विशेष लाँच किमतींमध्ये उपलब्ध केले आहेत. स्पर्धेच्या बाबतीत हा फोन विवो T5x 5G, मोटोरोला एज 60 फ्यूजन 5G, आणि ओप्पो K14 5G सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करेल.

रियलमी पी४आर 5जी फिचर्स

बॅटरी: तर या फोनमध्ये पॉवरफूल 8000mAh क्षमतेची बॅटरी आहे, जी एकदा चार्ज केल्यावर तीन दिवसांपर्यंत चालते असा दावा कंपनीने केला आहे. तसेच हा फोन 45W फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंगलाही सपोर्ट करतो.

चिपसेट: या मिड-रेंज रियलमी स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

रॅम: या फोनमध्ये 14GB पर्यंत डायनॅमिक रॅम आहे, ज्यामुळे व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने मल्टीटास्किंग आणि दैनंदिन कामे सोपी होतात.

डिस्प्ले: या फोनमध्ये 6.8-इंचाचा HD+ रिझोल्यूशन LCD स्क्रीन आहे जो 1200 nits पीक ब्राइटनेस आणि 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

कॅमेरा: या फोनमध्ये मागील बाजूस 50-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आणि पुढील बाजूस 8-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे.

एआय फीचर्स: या फोनमध्ये एआय इरेझर 2.0, एआय अल्ट्रा क्लॅरिटी, एआय अनब्लर, एआय पोर्ट्रेट ग्लो यांसारखी अप्रतिम फीचर्सदेखील आहेत.

ऑपरेटिंग सिस्टम: हा फोन सुरुवातीपासूनच Realme 7.0 वर चालतो, कंपनीने आश्वासन दिले आहे की या फोनला 2 ओएस अपग्रेड आणि 3 वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळतील.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा