AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हमास, हिजबुल्लाहनंतर इस्त्रायलचा या मुस्लिम देशावर भीषण हल्ला, ईराणी ऑक्टोपससाठी प्लॅन तयार

israeli airstrikes on syria: गुरुवारी इस्त्रायल लष्कराने मेजह आणि कादिसियाहवर हल्ले केले होते. सीरियाचे लष्कर आणि इस्लामिक जिहादच्या मुख्यालयाला लक्ष्य केले होते.त्यात 15 लोकांचा मृत्यू झाला होता

हमास, हिजबुल्लाहनंतर इस्त्रायलचा या मुस्लिम देशावर भीषण हल्ला, ईराणी ऑक्टोपससाठी प्लॅन तयार
israeli airstrikes
| Updated on: Nov 16, 2024 | 12:33 PM
Share

Israeli Airstrikes On Syria: गाजामध्ये हमास आणि लेबनानमध्ये हिजबुल्लाहविरोधात इस्त्रायल मोठी कारवाई करत आहे. त्याचवेळी इस्त्रायलवर हल्ला करणाऱ्या इराणलाही धडा शिकवला आहे. आता इस्त्रायलने आणखी एका मुस्लीम राष्ट्राविरोधात मोर्चा उघडला आहे. इस्त्रायलच्या हवाई दलाने ईराण आणि त्याच्या प्रॉक्सी संघटनांचा गड बनलेल्या सीरियावर भीषण हल्ले सुरु केले आहे. इस्त्रायल त्याला ईराणी ऑक्टोपस म्हणतो. इस्त्रायलने सीरियावरील हल्ले वाढवले आहे. सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सीरियाची राजधानी दमिश्कवर हल्ले वाढवले आहे.

हल्ल्यात 15 लोकांचा मृत्यू

गुरुवारी इस्त्रायल लष्कराने मेजह आणि कादिसियाहवर हल्ले केले होते. सीरियाचे लष्कर आणि इस्लामिक जिहादच्या मुख्यालयाला लक्ष्य केले होते.त्यात 15 लोकांचा मृत्यू झाला होता. रॉयटर्सच्या रिपोर्टनुसार, दमास्कसच्या या भागात पूर्वी हमास आणि इस्लामिक जिहादच्या दहशतवाद्यांची वस्ती होती. आता ते इराणी रिव्होल्युशनरी गार्ड आणि हिजबुल्लाचे प्रतिनिधीत्व करतात. त्यानंतर इस्त्रायलने शुक्रवारी हल्ले केले. शुक्रवारी झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया सीरियाने दिलेली नाही. या हल्ल्यांमध्ये इस्रायलने इराणी रिव्होल्युशनरी गार्ड आणि तेहरानच्या प्रॉक्सी अतिरेकी गटांच्या नेत्यांना लक्ष्य केले आहे.

इस्त्रायलकडून युनिट 4400 चे नुकसान

इस्त्रायलच्या आयडीएफने एक दिवस आधी सीरिया-लेबनॉन सीमेवर सीरियन क्रॉसिंगवर हल्ला केल्याचे म्हटले होते. हिजबुल्लाला शस्त्रे पाठवण्यासाठी या क्रॉसिंगचा वापर करण्यात येतो. क्रॉसिंगवरील हल्ल्यामुळे हिजबुल्लाहच्या युनिट 4400 चे मोठे नुकसान झाले आहे, असे इस्त्रायलने म्हटले आहे. इस्रायलने लेबनॉनमधील हवेतून 300 हून अधिक लक्ष्यांवर हल्ले केले, ज्यात बेरूतमधील दहियाहच्या मध्यभागी सुमारे 40 लक्ष्यांचा समावेश आहे.

हिजबुल्लाचे युनिट 4400 इराणमधून सीरिया आणि नंतर लेबनॉनमध्ये शस्त्रे पुरवठा करते. त्याचा वापर हिजबुल्ला इस्रायली सैन्य आणि होम फ्रंट विरुद्ध करतो. 10 दिवसांपूर्वी इस्त्रायलने दमिश्कमधील हिजबुल्लाहचे मुख्यालय आणि हिजबुल्लाच्या संपत्तीवर हल्ले केले होते. महिन्याभरापूर्वी हिजबुल्लाहच्या गुप्तचर विभागाचा प्रमुख हुसैन अली हजिमा याची बेरूतमध्ये हत्या करण्यात आली होती. इस्लामी जिहादी दशतवाद्यांवर कारवाई सुरुच राहणार असल्याचे इस्त्रायलने स्पष्ट केले आहे.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.