
Israel Attacks Iran and Inflation: मध्य-पूर्व देशात तणाव पुन्हा वाढला. इस्त्रायल आणि अमेरिकेने इस्त्रायलवर जोरदार हल्ला चढवला. तेहरान या राजधानीसह इतर सहा शहरांवर क्षेपणास्त्र डागण्यात आले आहे. खोमेनी यांच्या निवासस्थानाजवळ मोठा स्फोट झाला. तर या हल्ल्यात इराणचे लष्कर प्रमुखही ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. अद्याप त्याविषयीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. इस्त्रायलने सुद्धा नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन केले आहे. इराण प्रतिहल्ला करण्याची दाट शक्यता आहे. तर या युद्धाची झळ जगासह भारतालाही बसण्याची शक्यता आहे. आता जगभरात महागाई भडकण्याची शक्यता आहे. काय आहे ती मोठी अपडेट?
कच्च्या तेल्याच्या किंमती भडकणार
इराण हा तेल उत्पादक (Crude Oil) देश आहे. हे युद्ध ताणल्या गेले अथवा त्यात इतर देशांनी उडी घेतली तर इंधन पुरवठा साखळी बाधित होईल. त्यामुळे कच्च्या तेल्याच्या किंमती भडकतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारत हा जवळपास 80 टक्के तेल आयात करतो. जागतिक बाजारातील इंधनाच्या बदलत्या किंमतीचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर होण्याची शक्यता आहे. त्याआधारे इतर वस्तूही महाग होण्याची शक्यता आहे. महागाईचा भडका उडण्याची भीती आहे.
सोने-चांदीत तुफान
युद्धाचे ढग गडद झाल्यावर अनेक देशांच्या मध्यवर्ती आणि केंद्रीय बँका सोन्यात मोठी गुंतवणूक करतात. गेल्या पाच वर्षात जगातील सर्वच प्रमुख बँकांनी हेच धोरण राबवले आहे. सोने आणि चांदी हे गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानल्या जातात. युद्ध भडकले तर सोने आणि चांदीच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. दोन्ही मौल्यवान धातुची मागणी वाढेल आणि दोन्ही धातू पुन्हा नवीन उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. ग्राहकच नाही तर गुंतवणूकदारांनाही खिसा खाली करावा लागेल .
भारतीय शेअर बाजारावर परिणाम
युद्धाचे ढग गडद झाल्याने भारताच्या शेअर बाजारावर त्याचा परिणाम होईल. गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजार हा घसरणीच्या गडद छायेखाली आहे. बाजार सतत कोसळत असताना या युद्धाचे तीव्र परिणाम बाजारावर दिसतील. अनेक शेअर दणकावून आपटण्याची शक्यता आहे. भीतीने गुंतवणूकदार पैसा काढून घेण्याची शक्यता पण आहे. तर काहींच्या मते, भारतीय शेअर बाजारावर या युद्धाचा फार मोठा परिणाम दिसणार नाही. त्याची झळ मात्र दिसेल.
गॅस दरवाढीची भीती
कच्च्या तेलासह नैसर्गिक गॅसच्या किंमती युद्धादरम्यान भडकण्याची भीती आहे. युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होऊन एलपीजी आणि सीएनजीच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. तर विमानासाठीच्या इंधनाची किंमत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमान प्रवास महाग होऊ शकतो. भारतासाठी हे युद्ध एक आर्थिक संकट घेऊन येत आहे.