Iran Attack on Israel | ‘तुमच्यावर कोणी 350 मिसाइल्स डागली तर?’ संतप्त इस्रायली नेत्याचा अमेरिकेला सवाल

Iran Attack on Israel | मध्य पूर्वेमध्ये सध्या तणाव निर्माण झाला आहे. इराणने रविवारी इस्रायलवर मोठा हवाई हल्ला केला. पण इस्रायलने आपल्या उत्तम सुरक्षा प्रणालीद्वारे हा हल्ला परतवून लावला. त्यामुळे इराणची योजना यशस्वी होऊ शकली नाही. सध्याच्या या परिस्थितीवर इस्रायलच्या एका नेत्याने परखड शब्दात भाष्य केलं आहे.

Iran Attack on Israel | 'तुमच्यावर कोणी 350 मिसाइल्स डागली तर?' संतप्त इस्रायली नेत्याचा अमेरिकेला सवाल
Iran-Israel
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 12:40 PM

इराणने रविवारी इस्रायलवर शेकडो मिसाइल आणि ड्रोन्सनी हल्ला केला. इराणचा हा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही. इस्रायलच्या हवाई सुरक्षा कवच प्रणालीने ही सगळी मिसाइल्स आणि ड्रोन्स हवेतच नष्ट केली. इराणने पहिल्यांदाच इस्रायलवर थेट अशा प्रकारच्या हल्ल्याच धाडस केलं. अमेरिका आणि अन्य मित्र देशांच्या मदतीने इस्रायलने इराणची हल्ल्याची योजना धुळीस मिळवली. इराणने हे जे धाडस दाखवलं, त्याला इस्रायल कसं उत्तर देणार? याबद्दल विविध शक्यता व्यक्त केल्या जात आहेत. इराणच्या या हल्ल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या अध्यक्षतेखाली लगेच इस्रायलच्या वॉर कॅबिनेटची बैठक झाली. इराणला प्रत्युत्तर दिलं पाहिजे, असं वॉर कॅबिनेटचा सूर होता. पण हल्ला कधी आणि किती तीव्रतेचा करायचा? यावर मत मतांतर आहेत. त्यामुळे कुठल्याही निर्णयाशिवाय ही बैठक पार पडली.

दरम्यान तणाव आणखी वाढू नये, अशी अमेरिकेच्या ज्यो बायडेन प्रशासनाची भूमिका आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी बेंजामिन नेतान्याहू यांना स्पष्ट केलय की, “इस्रायलने आता प्रत्युत्तराची कारवाई केली, तर लष्करी मदत मिळणार नाही. अमेरिकेच्या या भूमिकेवर इस्रायलचे माजी पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांनी संताप व्यक्त केला आहे. “अमेरिकेवर कुणी 350 मिसाइल्स डागल्यानंतर त्यांची जी Action असती, इस्रायलने सुद्धा तसच करावं” असं बेनेट यांनी म्हटलं आहे. “अमेरिकी प्रशासन आम्हाला सांगतय की, इराणी हल्ल्यापासून बचाव करुन तुम्ही जिंकलात. पण हा इस्रायलचा विजय नाहीय. इराणला धडा शिकवण्याची गरज आहे” असं नेफ्ताली बेनेट यांनी म्हटलं आहे.

त्याशिवाय इस्रायलला सुद्धा शक्य झालं नसतं

इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर ब्लिंकन यांनी टर्की, इजिप्त, जॉर्डन आणि सौदीच्या परराष्ट्र मंत्र्यासोबत फोनवरुन चर्चा केली. इस्रायली नेत्यांनी इराणचा हल्ला परतवून लावण्याच श्रेय आंतरराष्ट्रीय लष्करी आघाडीला दिलं. समन्वयामुळे हे शक्य झालं. रणनितीक भागीदारीची ही सुरुवात असल्याच इस्रायलने म्हटलं आहे. मित्र देशांच्या मदतीशिवाय इतका मोठा हल्ला परतवून लावण इस्रायललाही शक्य नव्हतं.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.