AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Israel-Hamas War | इस्रायलने गाझामध्ये उतरवला हमासचा काळ, D9R च कोणीच काही नाही बिघडवू शकतं

Israel-Hamas War | इस्रायली सैन्याने D9R ला सर्वात पुढे ठेवल आहे. काय आहे D9R?. हमासकडे D9Rच उत्तर नाहीय. प्रत्यक्ष जमिनी युद्धामध्ये इस्रायली सैन्य D9R ची ताकत दाखवून देईल.

Israel-Hamas War | इस्रायलने गाझामध्ये उतरवला हमासचा काळ, D9R च कोणीच काही नाही बिघडवू शकतं
Israel-Hamas war
| Updated on: Oct 16, 2023 | 3:49 PM
Share

जेरुसलेम : इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धात आता चिलखती बुलडोजरची एंट्री झाली आहे. त्याच्यासमोर हमासचा सर्व दारुगोळा फुस्स होईल. हा चिलखती बुलडोजर गाझामध्ये घुसणार आहे. हा बुलडोजर पुढे राहून इस्रायली सैन्याला मार्ग करुन देईल. या बुलडोजरवर 15 टनाच अतिरिक्त कवच आहे. त्यावरुनच बुलडोजरच्या ताकतीची कल्पना येते. शत्रूच्या मोठ्यात मोठ्या हल्ल्यापासून हा बुलडोजर सुरक्षित राहू शकतो. इस्रायली सैन्याकडे असलेल्या बुलडोजरच नाव D9R आहे. मोठ्यात मोठ्या इमारतीला D9R सहज जमीदोस्त करुन रस्ता बनवू शकतो. गाजामध्ये जमिनी हल्ला सुरु करण्याआधी इस्रायली सैन्याने या बुलडोजरला सर्वात पुढे ठेवल आहे. दाट लोकवस्तीच्या भागात टँकसाठी हाच बुलडोजर रस्ता करुन देईल. रस्त्यात पेरलेले भू-सुरुंग असतील, तर ते दखील नष्ट करण्याची D9R ची क्षमता आहे. हमासकडे जितकी घातक शस्त्र आहेत, त्यातल एक सुद्धा या बुलडोजरचा रस्ता रोखू शकत नाही.

इस्रायली सैन्य जस-जस गाझापट्टीत प्रवेश करेल, त्यावेळी सुरक्षा चौक्या तोडण्याच काम बुलडोजर करेल. हा बुलडोजर खूप वजनी आहे. 62 टन या बुलडोजरच वजन आहे. इस्रायलच्या खतरनाक बुलडोजरची किंमत 739,000 पाऊड म्हणजे 7.5 कोटी रुपये आहे. बुलडोजरला अधिक सुरक्षित करण्यासाठी इस्रायली सैन्याने 2015 मध्ये बुलडोजरला अधिक अपग्रेड केलं. अपग्रेड दरम्यान बुलडोजरच्या पुढच्या भागात बुलेट-प्रूफ ग्लास बसवण्यात आल्या. यात मशीन गन आणि स्मोक प्रोजेक्टर सुद्धा आहे. किती पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू?

गाझा पट्टीत प्रवेश करण्याआधी इस्रायलने सर्वसामान्य नागरिकांना शहर खाली करण्याच फर्मान जारी केलं आहे. लाखो लोकांनी गाझा पट्टीतून पलायन सुरु केलय. जे लोक कुठे जाऊ शकले नाही, ते रुग्णालयात जमा झाले आहेत. इस्रायल हमासवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या युद्धात आतापर्यंत 2,329 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासच्या हल्ल्यात 1300 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.