Israel Attack Iran : खामेनेई यांच्या वाढदिवशीच बदला, कानठळ्या बसवाणारे आवाज; इस्रायल हात धुऊन मागे लागणार?

इराणने 13 एप्रिल रोजी रात्री उशिरा इस्रायलवर 300 मिसाइल आणि ड्रोन डागले होते. सीरियात इराणच्या दुतावासावर झालेल्या हल्ल्याचा इराणने बदला घेतला होता. त्यामुळे जग युद्धाच्या दिशेने जाते की काय अशी भीती वर्तवली जात होती. पण या हल्ल्यानंतर इस्रायलकडून कोणतचं प्रत्युत्तर आलं नव्हतं. त्यामुळे युद्ध टळल्याचं सांगितलं जात होतं. पण आज अचानक पहाटे इस्रायलने इराणवर हल्ला करून खळबळ उडवून दिली आहे.

Israel Attack Iran : खामेनेई यांच्या वाढदिवशीच बदला, कानठळ्या बसवाणारे आवाज; इस्रायल हात धुऊन मागे लागणार?
Israel Attack IranImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 10:05 AM

इस्रायलने अखेर इराणवर हल्ला केला आहे. इस्रायलने इराणच्या अनेक शहरांवर मिसाईलचा हल्ला चढवला आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यानेही या हल्ल्याची पुष्टी केली आहे. इराणच्या इस्फहान शहरात स्फोटाचा जबरदस्त आवाज ऐकायला मिळाला. कानठळ्या बसतील एवढा मोठा हा आवाज होता. विशेष म्हणजे इस्फाहन शहरात अनेक न्यूक्लिअर साईट आहेत. त्याशिवाय तबरेज शहरातही स्फोटाचे आवाज जाणवले. त्यामुळे इराणमध्ये एकच खळबळ उडाली आहे. महायुद्धाची ही सुरुवात असल्याचं सांगितलं जात आहे. या आधी इराणने इस्रायलच्या दिशेने ड्रोन डागले होते. त्यानंतर इस्रायलने आज हा सूड घेतला. इराणचे सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली खामेनेई यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. खामेनेई यांच्या वाढदिवशीच इस्रायलने हल्ला करून इराणच्या तोंडचे पाणी पळवले आहे.

इराणच्या फार्स न्यूज एजन्सीनेही इस्रायलने केलेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे. फ्लाइट ट्रॅकिंग वेबसाईट फ्लाइट रडारच्या वृत्तानुसार, स्फोटानंतर लगेचच इराणच्या एअरस्पेसच्या अनेक फ्लाइट्स डायव्हर्ट करण्यात आल्या. एकूण 8 विमानांचे मार्ग बदलण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. इराणने तेहरान, इस्फहान आणि शिराजला जाणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. इस्रायलने अमेरिकेवर हल्ला केला आहे. मात्र, सीरिया आणि इराकपर्यंत मिसाइलचा मारा केला की नाही याची माहिती मिळाली नसल्याचं अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.

कानठळ्या बसवणारे आवाज

इराणच्या अणूऊर्जा साइटवर तीन क्षेपणास्त्र टाकण्यात आली आहेत. त्यामुळे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने सर्व सैन्य तळांना हाय अलर्ट जारी केला आहे. तसेच एअर डिफेन्स सिस्टिम अॅक्टिव्ह करण्यात आली आहे. शुक्रवारी पहाटे हा हल्ला झाला आहे. इराणच्या इस्फहान शहरातील विमानतळांवर स्फोटाचे आवाज ऐकायला आले. कानठळ्या बसवणारे हे आवाज होते. या शहरातच अणूउर्जा केंद्र आहे. या ठिकाणी यूरेनियम प्रोग्राम चालतात.

इशारा दिला होता

इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर यांनी या हल्ल्याची गुरुवारी शक्यता वर्तवली होती. यावेळी त्यांनी इस्रायलला दमही भरला होता. जर इस्रायलने काऊंटर अटॅक केला तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा अमीर यांनी दिला होता.

न्यूक्लिअर प्लांट टार्गेट नाही

इस्रायलने इराणच्या न्यूक्लिअर प्लांटला निशाणा बनवून हल्ला केलेला नाही. इस्रायलनेही अमेरिकेला या बाबतची माहिती दिली आहे. आम्ही इराणच्या अणूऊर्जा केंद्राला टार्गेट केलं नसल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे.

Non Stop LIVE Update
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?
शिवसेना का सोडली? बाळासाहेबांना लिहिलेल्या पत्रात राणेंनी काय म्हटलं?.
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?
महायुतीत कुठल्या पक्षाला, किती जागा? जागावाटपाचा फॉर्म्युला कसा?.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेची उमेदवारी, छगन भुजबळ नाराज? काय म्हणाले?.
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?
ठाणे लोकसभेतून उमेदवारी जाहीर, नरेश म्हस्केंची पहिली प्रतिक्रिया काय?.
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?
अखेर कल्याण-ठाण्याचे उमेदवार शिंदे गटातून जाहीर, कुणाला लोकसभेच तिकीट?.
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला
मुख्यमंत्र्यांची पुन्हा तत्परता; रस्त्यात अपघात, शिंदेंनी ताफा थांबवला.
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका
घोडे समजून ज्यांना घेतलं ती खेचरं अन्.. ठाकरेंची शिंदे-फडणवीसांवर टीका.
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?
आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्ष लागली, अजितदादांचा निशाणा कुणावर?.