AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ISRO SPADEX: इस्रो आज अंतराळात करणार मोठा ‘धमाका’, नेमकं काय घडणार?

आज ISRO दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV C60 रॉकेटद्वारे दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. भारतासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे.

ISRO SPADEX: इस्रो आज अंतराळात करणार मोठा 'धमाका', नेमकं काय घडणार?
ISRO
| Edited By: | Updated on: Jan 03, 2025 | 5:12 PM
Share

ISRO SPADEX : आजचा दिवस खास आहे. कारण, आज ISRO 2 उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज रात्री 9 वाजून 58 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLV C60 रॉकेटद्वारे दोन उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे.

भारतासाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे. कारण या माध्यमातून अंतराळात डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी घेणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होणार आहे. या यशानंतर या तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे.

स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट (स्पेडेक्स) असे या मोहिमेचे नाव असून, त्याअंतर्गत एसडीएक्स-01 आणि एसडीएक्स-02 हे दोन उपग्रह अंतराळात प्रस्थापित केले जाणार आहेत. हे उपग्रह 476 किमी उंचीवर पृथ्वीच्या कक्षेत स्थापित केले जातील. उपग्रहांच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर जानेवारी 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून या उपग्रहांद्वारे अंतराळात डॉकिंग आणि अनडॉकिंगच्या तंत्रज्ञानाची चाचणी सुरू होईल.

अंतराळ मोहिमांसाठी खास

अंतराळ मोहिमांमध्ये डॉकिंग तंत्रज्ञानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हे तंत्रज्ञान अंतराळातील अंतराळयानांना एकमेकांशी जोडण्याची क्षमता प्रदान करते. दीर्घकालीन अंतराळ मोहिमा, मानवी मोहिमा आणि अंतराळयानांमध्ये पुरवठा पाठविणे यासारख्या महत्त्वाच्या कामांमध्ये याचा वापर केला जातो.

इस्रोची स्पेडेक्स मोहीम ही भारतासाठी अंतराळ विज्ञानाच्या क्षेत्रात नवी सुरुवात तर आहेच, शिवाय भविष्यातील अंतराळ मोहिमांचा मार्गही मोकळा करणार आहे.

इस्रोच्या विश्वासू प्रक्षेपकाची निवड

या मोहिमेसाठी PSLV C60 रॉकेटची निवड करण्यात आली आहे. हे इस्रोचे अग्रगण्य आणि विश्वासार्ह प्रक्षेपक आहे. या रॉकेटने यापूर्वी अनेक महत्त्वाच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. स्पेडेक्स मोहिमेच्या माध्यमातून डॉकिंग तंत्रज्ञानाची चाचणी आणि विकास भारताच्या अंतराळ मोहिमांना स्वावलंबी आणि प्रगत बनवेल, असे इस्रोने म्हटले आहे. या मोहिमेमुळे इस्रोची तांत्रिक क्षमता आणि जागतिक अंतराळ संशोधनात भारताची भूमिका अधिक बळकट होणार आहे.

‘या’ मोहिमेवर सर्व देशांचे लक्ष

इस्रोच्या स्पेडेक्स मोहिमेमुळे देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या मोहिमेचे यश भारताला अंतराळ विज्ञानाच्या नव्या आयामांवर घेऊन जाईल. या मोहिमेमुळे भारताच्या अंतराळ संशोधनाला अधिक बळकटी मिळेल आणि भविष्यातील मानवी अंतराळ मोहिमांचा भक्कम पाया तयार होईल. इस्रोच्या या नव्या उपक्रमामुळे भारताला अंतराळ संशोधनाच्या जागतिक व्यासपीठावर पुन्हा एकदा भक्कम स्थान देण्याचे आश्वासन मिळाले आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.