AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ती माहिती मिळताच…वॉशिंग्टन गोळीबाराची घटना.. PM नरेंद्र मोदींची मित्र ट्रम्प यांच्यासाठी पहिली प्रतिक्रिया

PM Narendra Modi Reaction on Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या वॉशिंग्टन येथील पत्रकारांसाठी आयोजित मेजवाणी कार्यक्रमादरम्यान गोळीबार झाला. या घटनेने सर्वच हादरले. हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान या सर्व घाडमोडींवर आणि मित्राबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ती माहिती मिळताच...वॉशिंग्टन गोळीबाराची घटना.. PM नरेंद्र मोदींची मित्र ट्रम्प यांच्यासाठी पहिली प्रतिक्रिया
नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्पImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 26, 2026 | 10:58 AM
Share

PM Narendra Modi Reaction on Donald Trump: राजधानी वॉशिंग्टन डीसी येथे पत्रकारांसाठी आयोजित मेजवाणी कार्यक्रमादरम्यान गोळीबार झाला. या कार्यक्रमात हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे होते. घटनेनंतर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. आरोपी आणि या हल्ल्यामागील कारणांचं पोलीस तपास करत आहेत. या घटनेने जगात खळबळ उडाली आहे. याविषय़ी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ट्रम्प हे सुरक्षित असल्याचे कळताच दिलासा मिळाल्याचे मोदी म्हणाले. त्यांनी सोशल मीडियावर मनातील भावना व्यक्त केल्या.

हल्ल्याचा केला निषेध

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत या हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी ट्रम्प यांच्यासह सर्व अधिकारी सुरक्षित असल्याची प्रार्थना केली. ती माहिती मिळताच दिलासा मिळाल की वॉशिंग्टन डीसीच्या कार्यक्रमातील गोळीबारात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, फर्स्ट लेडी आणि उपराष्ट्रपती हे सुरक्षित आहेत. मी ते सुरक्षित असो यासाठी प्रार्थना करतो. लोकशाहीत हिंसेला कोणतेही स्थान नाही. या घटनेचा निषेध करतो, असे मोदी यांनी ट्वीट केले आहे.

मेजवाणीच्या कार्यक्रमात गोळीबार

वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलमध्ये पत्रकारांसाठी मेजवाणीचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ट्रम्प यांची उपस्थिती होती. यावेळी कोल थॉमस एलन या हल्लेखोराने गोळीबार केला. त्याने काही राऊंड फायर केले. सुरक्षा यंत्रणांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. त्यामुळे त्याचा मनसुबा उधळला गेला. तो या हल्ल्यात जखमी झाला आहे. गोळीबाराची घटना घडली तेव्हा बॉलरुममध्ये डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया ट्रम्प, उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्यासह कॅबिनेट अधिकारी उपस्थित होते. घटना घडताच या सर्वांना सुरक्षितपणे हॉटेलमधून बाहेर काढण्यात आले.

या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हॉऊसमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यांनी या घटनेचा इराणशी संबंध लावत ही घटना मला युद्ध जिंकण्यापासून रोखू शकत नाही असे ते म्हणाले. कोल टॉमस एलन हा कॅलिफोर्नियातील रहिवाशी आहे. तो 31 वर्षांचा आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे. त्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याने हल्ला का केला. त्याच्या निशाण्यावर कोण होते याविषयीचा तपास सुरू करण्यात आला आहे. त्याचे कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नसल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे. तर हल्ल्यावेळी तो एकटाच होता की त्याच्यासोबत इतरही कोणी होते याची चौकशी सुरू आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल