AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Giorgia Meloni | प्रियकराची सेक्सी कमेंट, ‘या’ देशाच्या पंतप्रधानांनी पत्रकार जोडीदाराबरोबर तोडलं नातं

Giorgia Meloni | मागच्या 10 वर्षांपासून 'या' देशाच्या पंतप्रधान पत्रकार जोडीदाराबरोबर रिलेशनशिपमध्ये होत्या. टेलीविजन पत्रकार असलेल्या जोडीदाराने महिला सहकाऱ्यांबद्दल ऑन एअर काही कमेंट केल्या. 'तू मला आधी का नाही भेटलीस?' असं वक्तव्य केलं.

Giorgia Meloni | प्रियकराची सेक्सी कमेंट, 'या' देशाच्या पंतप्रधानांनी पत्रकार जोडीदाराबरोबर तोडलं नातं
Italy PM Giorgia Meloni
| Updated on: Oct 21, 2023 | 8:07 AM
Share

व्हेनिस : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या टेलीविजन पत्रकार पार्टनर एंड्रिया जियाम्ब्रुनोपासून वेगळ्या झाल्या आहेत. जॉर्जिया मेलोनी यांनी शुक्रवारी ही घोषणा केली. जॉर्जिया मेलोनी आणि एंड्रिया जियाम्ब्रुनो यांचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. जियाम्ब्रुनोने अलीकडेच ऑन एयर सेक्सिस्ट कमेंट केली. त्यामुळे जॉर्जिया मेलोनी यांच्यावर चौफेर टीका सुरु होती. “एंड्रिया जियाम्ब्रुनोसोबत मी 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपासून आमचे रस्ते वेगळे झालेत. आता हे स्वीकारण्याची वेळ आलीय” असं मेलोनी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलय. जॉर्जिया मेलोनी आणि एंड्रिया जियाम्ब्रुनो या जोडप्याला एक लहान मुलगी आहे. जियाम्ब्रुनो मीडियासेटद्वारे प्रसारीत होणाऱ्या एका न्यूज प्रोग्रामचा प्रेजेंटर आहे.

जियाम्ब्रुनोच्या कार्यक्रमाचे ऑफ-एयर काही फुटेज प्रसारीत झालं. यात ते अभद्र भाषेचा वापर करताना दिसतायत. त्याशिवाय एका सहकारी महिलेला म्हणतात की, ‘तू मला आधी का नाही भेटलीस?’. गुरुवारी टेलिकास्टची आणखी स्पष्ट रेकॉर्डिंग आहे. यात जियाम्ब्रुनो यांनी हद्दच केलीय. जियाम्ब्रुनो या फुटेजमध्ये एका प्रेमप्रकरणाबद्दल बढाई मारताना दिसतात. तुम्ही ग्रुप सेक्समध्ये भाग घेतला, तर माझ्यासाठी काम करु शकता, असं जियाम्ब्रुनो महिला सहकाऱ्यांना म्हणतो. जियाम्ब्रुनो वादात अडकण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सामूहिक बलात्कार प्रकरणात केलेल्या कमेंटमुळे त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. बलात्कारच्या गुन्ह्यांसाठी उलट त्यांनी पीडितेलाच जबाबदार धरल होतं.

‘नशेमध्ये असताना तुम्ही तुमची इंद्रिय वाचवलीत, तर….’

जियाम्ब्रुनो यांनी शो मध्ये एक कमेंट केली. “तुम्ही नाचायला गेलात, तर तुम्हाला नशेमध्ये गुंग होण्याचा पूर्ण अधिकार आहे. नशेमध्ये असताना तुम्ही तुमचं चित्त थाऱ्यावर ठेवलंत तर, तर काही समस्यांमध्ये अडकण्यापासून तुम्ही स्वत:ला वाचवू शकता” प्रियकर जियाम्ब्रुनोच्या या वक्तव्यानंतर मेलोनी म्हणालेल्या की, “माझ्या जोडीदाराने केलेल्या टिप्पणीच्या आधारावर तुम्ही माझ्याबद्दल मत बनवू नका” “भविष्यात जियाम्ब्रुनोच्या वर्तनाबद्दल उत्तर देणार नाही” असं मेलोनी यांनी स्पष्ट केलं होतं.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.