AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारले गेले मसूद अझहरचे अख्ये खानदान, जैशच्या कमांडरचा मोठा कबूलनामा, थेट केले दावे, पाकडे पडले तोंडावर

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. मोठे हल्ले दहशतवादी स्थळांवर करण्यात आली. मात्र, पाकिस्तानने सुरूवातीला असे काही घडले नसल्याचा बनाव केला. मात्र, त्यानंतर काही व्हिडीओ पाकिस्तानातून पुढे आली. आता मोठा खुलासा करण्यात आलाय.

मारले गेले मसूद अझहरचे अख्ये खानदान, जैशच्या कमांडरचा मोठा कबूलनामा, थेट केले दावे, पाकडे पडले तोंडावर
Masood Azhar
| Updated on: Sep 16, 2025 | 2:12 PM
Share

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले. आता या ऑपरेशन सिंदूरनंतर जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेला किती मोठे नुकसान झाले हे पुढे आले. भारतीय लष्कराच्या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचे अख्ये खानदान मारले गेले. पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या कमांडर मसूद इलियास कश्मीरी याने सुरक्षा यंत्रणांसमोर धक्कादायक कबुली दिली आहे. त्याने मान्य केले आहे की, 7 मे 2025  मध्ये भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचे पूर्ण कुटुंब मारले गेले.

आता हा धक्कादायक आणि खळबळ उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतोय. हेच नाही तर यासोबतच काही कबुलनामे देताना जैश-ए-मोहम्मदचा कमांडर दिसत आहे. जैश-ए-मोहम्मदचा कमांडर मसूद इलियास कश्मीरी याने मान्य केले की, बहावलपूरमध्ये झालेल्या हल्ल्यात मसूद अजझरच्या घरातील सदस्यांचे जीव गेले. मसूद इलियास कश्मीरी व्हिडीओमध्ये स्पष्टपणे म्हणत आहे की, भारतीय लष्कराने 7 मे 2025 ला बहालपूर येथील दहशतवादी अड्ड्यावर हमला केला.

त्यावेळी मसूद अझहरचे संपूर्ण कुटुंब त्याचठिकाणी होते. आम्ही दहशतवादाला गळ्याला लावले. आम्ही या देशाच्या सीमेच्या रक्षेसाठी दिल्ली, काबुल आणि कंधारची लडाई लढली. सर्वकाही बलिदान केले. 7 मे ला मसूद अझदरच्या कुटुंबाला भारतीय लष्कराने संपवले. हेच नाही तर व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, कश्मीरी हा बोलत आहे त्यावेळी त्याच्यामागे अनेक लोक बंदूक घेऊन उभी आहेत. भारताने पहलगाम हल्ल्लाचा बदला घेण्यासाठी हा हल्ला केला होता.

पाकिस्तानातून आलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये मोठा हल्ला केला. या हल्ल्यात अनेक पर्यटकांवर गोळ्या झाल्या. या हल्ल्याचे धक्कादायक अशी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसली. पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात चिड दिसली. भारताने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर राबून मसूद अझहरचे कंबरडे मोडून पूर्ण खानदानाला मारले आहे. आता जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरनेच तश कबूली देखील दिली. आता हा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला असून पाकिस्तानातीलच हा व्हिडीओ असल्याचा दावा केला जातोय.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...