अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जपान सरकारकडून मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा; प्रत्येक तरुणाला मिळणार एक लाख येन

गेल्या काही महिन्यांत जपानमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. महागाई नियंत्रणात आणून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी जपान सरकारकडून विविध उपयाययोजना अंमलात आणल्या जात आहेत.

अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी जपान सरकारकडून मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा; प्रत्येक तरुणाला मिळणार एक लाख येन

टोकियो – गेल्या काही महिन्यांत जपानमध्ये महागाईने उच्चांक गाठला आहे. महागाई नियंत्रणात आणून अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी जपान सरकारकडून विविध उपयाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता सरकारकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल 490 अब्ज डॉलर (56 ट्रिलियन येन) च्या प्रोत्साहनपर पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे.

अर्थव्यवस्थेला मिळणार बळकटी

जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, सध्या अर्थव्यवस्थेवर कोरोनाचे सावट आहे. कोरोनामुळे उद्योगधंदे डबघाईला आले आहेत. उद्योगांना कोरोनातून सावरण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारकडून 490 अब्ज डॉलरच्या प्रोत्साहनपर पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. या पॅकेजला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून, या निधीतून नागरिकांना रोख आर्थिक सहाय्य तसेच डबघाईला आलेल्या उद्योगांना मदत करण्यात येणार आहे.

प्रत्येक तरुणाला 880 डॉलरची मदत

पुढे बोलताना किशिदा म्हणाले की, अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी 490 अब्ज डॉलरच्या प्रोत्साहनपर पॅकेजचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंत्रीमंडळाकडून परवानगी देण्यात आली आहे. लकरच निधीच्या वाटपाला सुरुवात होईल. या पॅकेजमधून जपानमधील प्रत्येक तरुणाला एक लाख जपानी येनची म्हणजेच 880 डॉलरची मदत करण्यात येणार आहे. तसेच जे उद्योग डबघाईला आले आहेत, त्या उद्योगांना देखील मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल. यामुळे अर्थव्यवस्थेला बळकटी मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

संबंंधित बातम्या 

ऑनलाईन कर्ज प्रकरणात फसवणूक टाळण्यासाठी आरबीआयचे मोठे पाऊल; घेतला ‘हा’ निर्णय

भारतातील पेट्रोल, डिझेलचे दर स्वस्त करण्यासाठी अमेरिकेची मदत; काय आहे नवी रणनिती?

परकीय चलन गंगाजळीत पुन्हा एकदा घट; जाणून घ्या अर्थव्यवस्थेसाठी किती महत्त्वपूर्ण असते परकीय चलन

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI