AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणखी एका देशाची ताकद वाढली, 80 वर्षांनंतर केली क्षेपणास्त्र चाचणी

आणखी एका देशाने आपली लष्करी ताकद वाढवली आहे. या देशाने पहिल्यांदाच आपल्या हद्दीत क्षेपणास्त्र चाचणी केली आहे.

आणखी एका देशाची ताकद वाढली, 80 वर्षांनंतर केली क्षेपणास्त्र चाचणी
japan tested first missile
| Updated on: Jun 24, 2025 | 6:58 PM
Share

जग सध्या तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरु आहे. युद्धबंदीनंतर दोन्ही देशांकडून हल्ले होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आता जपाननेही आपली लष्करी ताकद वाढवली आहे. या देशाने पहिल्यांदाच आपल्या हद्दीत क्षेपणास्त्र चाचणी केली आहे. त्यामुळे आता प्रत्येक देश तिसऱ्या महायुद्धाची तयारी करत असल्याचे दिसत आहे.

जपानने होक्काइडो बेटावरील शिझुनाई अँटी-एअर फायरिंग रेंजवर टाइप-88 सरफेस टू शिप या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. जपानने शत्रू देशांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि चीनला शह देण्यासाठी ही चाचणी घेतली असल्याचे बोलले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जपानच्या ग्राउंड सेल्फ डिफेन्स फोर्सच्या फर्स्ट आर्टिलरी ब्रिगेडने या चाचणीत भाग घेतला होता. यात 300 सैनिक सहभागी होते. या सैनिकांनी होक्काइडोपासून सुमारे 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या बोटीवर हल्ला केला.सध्या या चाचणीचे निकाल तपासले जात आहे. त्यानंतर ही चाचणी यशस्वी झाली की नाही याची माहिती समोर येणार आहे.

टाइप 88 क्षेपणास्त्र काय आहे?

टाइप 88 हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जहाजावर मारा करणारे मिसाईल आहे. हे 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धात जपानच्या मित्सुबिशी हेवी इंडस्ट्रीजने विकसित केले होते. सुरुवातीला हवेत सोडले जाणारे हे मिसाईल नंतर जहाजावर हल्ला करण्यासाठी डिझाईन बनवण्यात आले आहे. हे 200 किमीपर्यंत हल्ला करु शकते.

जपानचा लष्करी ताकद वाढवण्यावर भर

जपान आपली लष्करी क्षमता वाढवण्यावर भर देत आहे. चीनच्या वाढत्या लष्करी कारवायांना उत्तर देण्यासाठी जपान स्ट्राइक-बॅक क्षमता विकसित करत आहे. जपान या वर्षाच्या अखेरीस टोमाहॉक्स सारख्या लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्रांची तैनाती करण्याच्या विचारात आहे अशी माहिती समोर आली आहे.

यापूर्वी परदेशात चाचणी

जपानने याआधी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. मात्र ही देशातील पहिलीच चाचणी आहे. ही चाचणी जपानची लष्करी तयारीसह प्रादेशिक स्थिरतेसाठी महत्त्वाची आहे. जपान याआधी बचावात्मक भुमिकेत होते, मात्र आता ते आक्रमक भूमिका स्वीकारत असल्याचे समोर आले आहे.

नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा.
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स.
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका.
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका
...हे श्रीमंत भिकाऱ्यांचं लक्षण, संजय राऊत यांची भाजपवर जहरी टीका.
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.