Video : थरारक! पाठीवर बॉम्बची बॅग, मागून गाडी येताच धड्यॅsssम! कराचीतील सुसाईड बॉम्बर सीसीटीव्हीत कैद

Karachi Blast Video : मंगळवारी झालेल्या कराचीतील हल्ल्याची जबाबदारी बलोच लिबरेशन फ्रंटने घेतली.

Video : थरारक! पाठीवर बॉम्बची बॅग, मागून गाडी येताच धड्यॅsssम! कराचीतील सुसाईड बॉम्बर सीसीटीव्हीत कैद
असा झाला ब्लास्ट...
सिद्धेश सावंत

|

Apr 27, 2022 | 7:32 AM

कराची : कराचीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Karachi Blast Video CCTV) धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये सुसाईड बॉम्बर (Suicide Bomber) महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या महिलेचं नाव शारी बलोच असल्याची माहिती समोर आलीय. बलोच लिबरेशन फ्रंटनं हा हल्ला घडवून आणला. कराची विद्यापीठ (Karachi University) मंगळवारी दुपारी दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनं हादरुन गेलं. या हल्ल्यात पाच जण ठार झाले. पाठीवर असलेली बँग घेऊन असलेली ही महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसली आहे. या महिलेलं हिजाब घातलाय. त्यामुळे तिचा चेहरा झाकलेला होता. रस्त्याच्या कडेला ही महिला चालत येताना दिसते. एका विशिष्ट ठिकाणी ही महिला थांबते. मागून गाडी येत असल्याचं दिसताच अचानक धड्यॅsssम आवाज होता. हा आवाज संपूर्ण परिसराला हादरवून टाकतो. कराची विद्यापिठाच्या आवारात झालेल्या या हल्ल्यानं सगळेच बिथरतात. पाच जणांचा या हल्ल्यामध्ये जागीच मृत्यू होतो. मृतांमध्ये चीनच्या तीन महिला प्रोफेसर, पाकिस्तानी नागरीक असलेला गाडीचा चालक आणि सुरक्षा रक्षक यांचा समावेश आहे. कराची विद्यापीठाच्या कन्फ्युशिअर इन्स्टिट्यूटजवळ सुसाईड बॉम्बर महिलेनं हा हल्ला घडवून आणला.

धक्कादायक व्हिडीओ – पाहा सीसीटीव्ही

हिजाब आणि बुरखा घालून आलेली हा महिला संशयास्पदरित्या वावरताना दिसून आली आहे. बॉम्ब स्फोटानंतर या ठिकाणी गोळीबारही झाला. या गोळीबारा चार पोलीसही जखमी झालेत. हल्ल्यावेळी ही महिला एकटी नव्हती. या महिलेसोबत तिचे साथीदारही सोबत होते. या धक्कादायक घटनेननंतर आता या महिलेच्या सहकाऱ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली जातेय.

मंगळवारी झालेल्या कराचीतील हल्ल्याची जबाबदारी बलोच लिबरेशन फ्रंटने घेतली. या संघटनेनं याआधीही दहशतवादी हल्ले पाकिस्तानात केलेत. गिलगीटमध्ये लष्कराच्या तळावर बलोच लिबरेशन फ्रंटनं हल्ला केलेला. त्यात एकूण 22 जवान आणि दोघा नागरीकांना जीव गमवावा लागला होता.

तालिबान विरुद्ध पाकिस्तान…

पाकिस्तानमध्ये राजकीय स्थिती बिघडली असतनाच आता सामाजिक स्थिती ही बिघडल्याचे समोर येत आलंय. पाकिस्तानवर तालिबानने गंभीर आरोप केलाय. तालिबानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानविरोधात तक्रार दाखल केली. पाकिस्तानच्या लष्कराने आमच्या खोस्त आणि कुनार प्रांतात हवाई हल्ले केल्याचा आरोप तालिबानने केलाय.

पाकिस्तानसाठी हा मोठा हादरा मानला जात असतानाच आता पाकिस्तान अंतर्गत हल्ल्यांनीसुद्धा हादरल्याचं मंगळवारी पाहायला मिळालंय. मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर पाकिस्तानातील यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. तर बंदोबस्तातही वाढ करण्यात आली. दुसरीकडे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें