AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या आईनेच… ट्रम्प-पुतीन भेटीवर सवाल विचारताच भडकली, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीचं सडेतोड प्रत्युत्तर

व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट या नेहमी चर्चेत असतात. आता त्या पुन्हा प्रकाशझोतात आल्या आहेत, पण त्याचं कारण जरा वादग्रस्त आहे. खरंतर लेव्हिट यांनी हफिंग्टन पोस्टच्या रिपोर्टरला "डाव्या विचारसरणीचा हॅकर" असे संबोधून वाद निर्माण केला. पत्रकाराने ट्रम्प-पुतिन भेटीबद्दल प्रश्न विचारला तेव्हा हे प्रकरण वाढले. काय आहे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया.

तुमच्या आईनेच... ट्रम्प-पुतीन भेटीवर सवाल विचारताच भडकली, व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरीचं सडेतोड प्रत्युत्तर
| Updated on: Oct 21, 2025 | 11:15 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) हे सतत चर्चेत असतात. त्यांच्याप्रमाणेच व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिलव कॅरोलिन यांनी हफिंग्टन पोस्टच्या रिपोर्टरवर जोरदार हल्ला चढवला . एवढंच नव्हे तर त्याला “डाव्या विचारसरणीचा हॅकर” देखील म्हटलं. कारण काय तर त्या पत्रकाराने त्यांना युक्रेनमधील युद्ध संपवण्याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील आगामी बैठकीबद्दल प्रश्न विचारला होता. लेव्हिट यांच्या विधानामळे नवा वाद निर्माण होऊ शकतो.

काय आहे प्रकरण ?

ट्रम्प यांच्यावरील टीकात्मक कव्हरेजसाठी ओळखले जाणारे वरिष्ठ राजकीय पत्रकार एसव्ही डीटीई यांनी लेव्हिटला एक प्रश्न विचारला होता. महत्त्वाच्या शिखर परिषदेसाठी बुडापेस्टमधील कोणी स्थान निवडले ? असा तो सवाल होता. मात्र त्यानंतर हा वाद वाढतच गेला. त्यावर लेव्हिटने अवघ्या एका वाक्यात उत्तरं दिलं, ते म्हणजे “तुमच्या आईने निवडलं आहे.”

नंतर तिने सोशल मीडियावर त्यांच्या प्रतिसादाचा स्क्रीनशॉटही शेअर केला. “संदर्भासाठी, हफिंग्टन पोस्टचे एस.व्ही डेट याला तथ्यांमध्ये रस नाही. तो एक डाव्या विचारसरणीचा हॅकर आहे जो वर्षानुवर्षे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पवर सतत हल्ला करतोय. आणि माझ्या फोनवर लोकशाही समर्थक प्रचाराचा भडिमार करत आहे.” असं तिने त्यामध्ये लिहीलं होतं. “डेटच्या फीडवर एक नजर टाका; ते ट्रम्पविरोधी वैयक्तिक डायरीसारखे आहे. खरे पत्रकार असल्याचे भासवणारे कार्यकर्ते या व्यवसायाला कलंक लावतात.” अशी घणाघाती टीकाही तिने केली.

ट्रम्प-पुतीन भेट कधी ?

ट्रम्प-पुतिन यांच्या पूर्वनियोजित शिखर परिषदेची नेमकी तारीख किंवा ठिकाण व्हाईट हाऊसने अद्याप निश्चित केलेले नाही, परंतु पुढील दोन आठवड्यात बुडापेस्टमध्ये ती होण्याची शक्यता आहे. 15 ऑगस्ट रोजी अलास्का येथे झालेल्या त्यांच्या मागील बैठकीमध्ये कोणताही प्रगति झाली नाही आणि ती तशीच संपुष्टात आली. कारण पुतिन यांनी ट्रम्पचा तात्काळ युद्धबंदीचा प्रस्ताव नाकारल्याचे वृत्त होते. दरम्यान, गेल्या आठवड्यात वॉशिंग्टनमध्ये ट्रम्प यांची भेट घेतलेले युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी त्यांच्यातील चर्चा सकारात्मक असल्याचे वर्णन केले आणि युक्रेन आता भेटीनंतर 25 पॅट्रियट हवाई संरक्षण प्रणालींसाठी कराराची तयारी करत असल्याचे सांगितलं.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.