AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोमँटिक बोलण्यामध्ये फसला, देशासोबत गद्दारी करुन बसला, ISI च्या हनी ट्रॅपमध्ये असा अडकला अमन

Pakistan ISI Honey Trapped: पाकिस्तानची गुप्तहेर संघटना देशातील तरुणांना प्रेमाच्या अथवा विविध आमिषाच्या जाळ्यात ओढून देशद्रोही कृत्य करण्यासाठी धमकी देते. त्यातच एक तरुण अडकला. त्याने देशाशी गद्दारी केली.

रोमँटिक बोलण्यामध्ये फसला, देशासोबत गद्दारी करुन बसला, ISI च्या हनी ट्रॅपमध्ये असा अडकला अमन
पाकिस्तान आयएसआय
| Updated on: Sep 20, 2026 | 12:33 PM
Share

पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआय (ISI) भारतातील तरुणांना डिजिटल जाळ्यात फसवते. प्रेमाच्या अथवा विविध मोहाच्या जाळ्यात अडकून त्यांना हेरगिरी करायला लावते. अशाच एका हायटेक हेरगिरी प्रकरणाचा पर्दाफाश झाला आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी एका ड्रायव्हरला अटक केली आहे. अमन असे या आरोपीचे नाव आहे. आयएसआयने त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवले. त्याने कठुआ येथील घराच्या बाहेर सिम इनेबल्ड स्पाय कॅमेरा बसवला. त्यामुळे भारतीय सैन्याच्या ताफ्याची आणि लष्करी हालचालींची 24X7 लाईव्ह फुटेज पाकिस्तानी हँडलर्संना मिळत होती. जम्मू-काश्मीर पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांच्या संयुक्त कारवाईत हा भांडफोड झाला. आरोपीविरोधात ऑफिशियल सीक्रेट्स ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

असा अडकला आयएसआयच्या जाळ्यात

कठुआ येथील अमन याला पाकिस्तानी एंजट्सनी सोशल मीडियावर फॉलो केले. त्याच्या मॅसेंजरमध्ये अश्लील आणि फ्लर्टी चॅट पाठवले. त्यामुळे तो भाळला. तो हळूहळू हॅनीट्रॅपमध्ये अडकत गेला. त्यानंतर त्याला संवेदनशील कठुआ सीमावर्ती भागातील भारतीय सैन्यांचे तळ, महामार्गाची रेकी करण्यास सांगण्यात आले. आरोपीने घराबाहेर कॅमेरा लावण्यासाठी पाकिस्तानी हँडलर्सकडून 20 हजार रुपये घेतले होते. याचे पेमेंट हे दुबईमार्गे करण्यात आले. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला. तो फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला आहे.

जम्मूमध्ये ISI ची नवीन डिजिटल पद्धत

ISI या भागात हनीट्रॅपमध्ये अनेक तरुणांना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे समोर आले आहे. येथील तरुणांचे सोशल मीडिया प्रोफाईल तपासून त्यांच्यावर जाळे फेकण्यात येत आहे. जम्मू परिसरात हनीट्रॅप नेटवर्कची ही दुसरी घटना आहे. आता केवळ फोटो पाठवण्याऐवजी आयएसआयने नवीन पद्धत अवलंबली आहे. त्यांनी 24 तास लाईव्ह सर्व्हिलन्स फीड घेण्याची नवी पद्धत अवलंबली आहे. मे महिन्यात जम्मूच्या मकवाल भागातील तरुण करण कुमार याला स्नॅपचॅटवरून असेच जाळ्यात ओढण्यात आले होते. त्याच्याकडून सैन्याच्या हालचालींचे फोटो आणि व्हिडिओ मागवण्यात आले होते. तर पठाणकोटमध्ये सुजानपूर महामार्गावर स्पाय कॅमेरा लावून सैन्याच्या वाहनांवर नजर ठेवणाऱ्या एका गुप्तहेराला अटक करण्यात आली होती.

Follow Us
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान