AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चीनचा कुबेर अचानक बेपत्ता, सरकारसोबतचा वाद भोवला? प्रकरण काय?

साऱ्या जगात खळबळ माजलीय. कारण, जॅक मा बेपत्ता होण्याचं कनेक्शन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत जोडलं जातंय.

चीनचा कुबेर अचानक बेपत्ता, सरकारसोबतचा वाद भोवला? प्रकरण काय?
| Updated on: Jan 04, 2021 | 11:58 PM
Share

बीजिंग : जिनपिंग सरकारबाबत चीनमध्ये तीव्र रोष असल्याचं दिसतंय. जेमतेम 60 किलो वजनाचा एक चिनी उद्योजक जगातील 100 देशांच्या अर्थव्यवस्थांना भारी आहे. मल्टिनॅशनल कंपन्याच नाही, तर अख्खे देशच विकत घेण्याची धमक या हडकुळ्या माणसाच्या मनगटात भरलीय. कागदावर जरी या माणसाचं नाव जॅक मा असलं, तरी चीनमध्ये त्याची ओळख मिस्टर इंटरनेट म्हणून होते. सारं जग या माणसाला अलिबाबा कंपनीचा फाऊंडर म्हणून ओळखतं (Know all about why China Businessman Jack Ma missing from 2 months).

अलीबाबाचा हाच फाऊंडर व्यक्ती गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता आहे. जॅक मा यांचं ट्विटर अकाऊंट सक्रीय आहे. त्यांना मागील काही दिवसांमध्ये सार्वजनिक कार्यक्रमातही पाहिलं नाहीये. परंपरवादी चीनला ज्या माणसानं इंटरनेटचं वेड लावलं, चीनच्या टेकवर्ल्डवर ज्या माणसानं एकहाती सत्ता गाजवली, तोच माणूस म्हणजे जॅक मा 2 महिन्यांपासून नॉट रिचेबल आहे. त्यामुळे साऱ्या जगात खळबळ माजलीय. कारण, जॅक मा बेपत्ता होण्याचं कनेक्शन चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत जोडलं जातंय.

नेमकं प्रकरण काय?

जॅक मा चिनी उद्योजक असले, तरी चीन सरकारच्या धोरणांवर त्यांनी वारंवार आसूड ओढले आहेत. काही महिन्यांपूर्वीच जॅक मां नी चीनच्या सरकारी बँका आणि आर्थिक नियमांवर बोचरे वार केले होते. शांघायमध्ये झालेल्या कार्यक्रमात चीनच्या बँका म्हणजे ”वृद्ध लोकांचा क्लब बनल्या आहेत”, अशा शब्दात त्यांनी जिनपिंग सरकारवर हल्ला केला. तेव्हापासूनच जॅक मा चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या रडारवर आले. जॅक मा यांना टीकेच्या फक्त 4 शब्दाची मोठी किंमत मोजावी लागली.

याच टीकेनंतर जिनपिंग यांनी जॅक मा यांच्या कंपन्यांविरोधात कारवाईचा धडाका सुरु केला. जॅक मा यांच्या अँट ग्रृपच्या 37 अब्ज डॉलरचा आयपीओ देखील निलंबित करण्यात आलाय. वॉल स्ट्रिटच्या दाव्यानुसार निलंबनाचं फर्मान थेट जिनपिंग यांच्या कॅबिनमधून सुटलं होतं. नोव्हेंबर महिन्यात जॅक मा यांच्या अनेक कंपन्यांमागे चौकशीचा फेरा लागला. त्यावेळी जॅक मा यांनी सूचक विधान केलं होतं. ते म्हणाले होते, “जोपर्यंत मी चीनमध्ये आहे, तोपर्यंत अलीबाबा समुहाविरोधात सुरु झालेला तपास पूर्ण होणार नाही.”

जॅक मा कोण आहेत? चिनी माणसानं स्वतःच्या कंपनीचं नाव ”अलीबाबा” का ठेवलं?

आता जॅक मा हा व्यक्ती नेमका आहे कोण आणि एका चिनी माणसानं स्वतःच्या कंपनीचं नाव ”अलीबाबा” का ठेवलं, ते सुद्धा समजून घेऊयात. जॅक मा चीनच्या सर्वसाधारण कुटुंबात जन्मले. 1995 सालात मित्रांसोबत त्यांनी अमेरिकेचा दौरा केला. अमेरिका दौऱ्यावेळी पहिल्यांदा त्यांची इंटरनेटशी ओळख झाली. इंटरनेटची कमाल आणि त्याची ताकद जॅक मा यांनी ओळखली.

चीनमध्ये परतल्यानंतर त्यांनी पहिली वेबसाईट उघडली. तो प्रयोग फसल्यानंतर नंतर त्यांनी मित्रांकडून कर्ज घेतलं आणि अलिबाबा नावाची ई-कॉमर्स साईट उघडली. कंपनीचं नाव ठेवण्याआधी त्यांनी भारतासह अनेक देशांचे दौरे केले. त्या-त्या देशांत भेटलेल्या लोकांना त्यांनी अलिबाबा माहिती आहे का, असे प्रश्न केले. भारत, रशिया, जर्मनीसह अनेक देशातल्या लोकांना अलिबाबा नाव ठाऊक होतं. म्हणून त्यांनी आपल्या कंपनीचं नावंही अलिबाबा ठेवलं.

ट्रम्पपासून ते ओबामांपर्यंत सर्वांना जॅक मा यांची भुरळ

भारतातली गुंतवणूक आणि भारतीय मार्केटबद्दल जॅक मा नेहमी आशावादी राहिले आहेत. भारत-चीन हे दोन्ही देश आशियाचं नव्हे, तर जगाचं नेतृत्व करु शकतात, असं त्यांच्या विधानांमधून वारंवार प्रतित झालंय. मात्र कोरोनाच्या काळात जॅक मा यांनी भारताला देऊ केलेली मदत सुद्धा चीन सरकारला खटकली होती. डोनाल्ड ट्रम्पपासून ते बराक ओबामांपर्यंत सर्वांना जॅक मा यांनी भुरळ घातलीय. भारतासह जगभरातल्या 200 हून जास्त देशांमध्ये जॅक मा यांचा व्यापार पसरलाय. पेटीएम, बिग बास्केट, झोमॅटोमध्येही गुंतवणूक आहे. मात्र चीनमध्ये आजपर्यंत जो-जो व्यक्ती सत्तेपेक्षा मोठा झालाय, तो-तो चीन सरकारच्या डोळ्यात खुपलाय.

जिनपिंग यांची धोरणं आणि कोरोनाचा प्रसार यामुळे अनेक देशांमध्ये चिनी उद्योजकांच्याही अडचणी वाढल्या आहेत. चीन सरकार आणि चिनी कंपन्या यांचा परस्पर काहीही संबंध नाही. म्हणून अनेक चिनी उद्योजकांनी निवेदनंही दिली आहेत. मात्र जर जिनपिंग यांची नाराजी पुढे आली, तर चीन सत्तेविरोधात धगधगत असलेल्या असंतोषात ही सर्वात मोठी ठिणगी ठरेल.

हेही वाचा :

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गायब, चीनमध्ये यापूर्वीही सरकारविरोधी बोलणारे हायप्रोफाईल्स बेपत्ता

चीनचे अब्जाधीश जॅक माला 2 महिन्यात 80 हजार कोटींचं नुकसान, नेमकं काय झालं?

जॅक-माच्या अलीबाबा ग्रुपच्या अडचणीत वाढ, चीन सरकारचे चौकशीचे आदेश

Know all about why China Businessman Jack Ma missing from 2 months

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.