भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या ‘या’ मुस्लिम देशात चक्क श्रीकृष्णाचं सर्वात भव्य मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
Krishna Janmashtami 2025: भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेल्या 'या' मुस्लिम देशात कृष्ण भक्तांची संख्या फार मोठी, देशातील सर्वात मोठ्या श्रीकृष्ण मंदिराचा इतिहास आणि महत्त्व जाणून व्हाल थक्क

Krishna Janmashtami 2025: 16 ऑगस्ट म्हणजे आजच्या दिवशी भारतात मोठ्या उत्साहात आणि आनंदात जन्माष्टमी म्हणजे कृष्ण जन्म हा सण साजरा केला जातो. फक्त भारतात नाही, ज्या देशांमध्ये हिंदू धर्माचे लोकं आहेत, त्या देशांमध्ये जन्मष्टमी साजरी केली जाते. हा हिंदू धर्मासाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. एवढंच नाही तर, भारताचा सर्वात मोठा शत्रू पाकिस्तान देशात देखील जन्मष्टमी साजरी करण्यात येते. आजच्या दिवशी पाकिस्तान येथील मंदीरांमध्ये आरती, पूजा देखील केली जाते. तर अखेर जाणून घेऊ पाकिस्तानातील सर्वात मोठा मंदिर कोणता आहे.
पाकिस्तान येथील सर्वात मोठा कृष्ण मंदिर
पाकिस्तान येथे भगवान श्रीकृष्ण यांचं सर्वात मोठं मंदिर रावळपिंडी येथे आहे. 1897 साली मंदिराची स्थापना करण्यात आली आणि हे कृष्ण मंदिर रावळपिंडी येथील सर्वात मोठं मंदिर आहे. हे मंदीर कांची मल आणि उजाहर मल राम पांचाल यांनी बांधलं आहे. 1947 रोजी फाळणी झाल्यानंतर काही काळासाठी मंदिर बंद ठेवण्यात आलं होतं. पण त्यानंतर मंदिर भक्तांसाठी खुलं करण्यात आलं….
सांगायचं झालं तर, पूर्वी याठिकाणी राहणारे नागरिक मंदिराची देखरेख करायचे. पण 1970 मध्ये मंदिर ईटीपीबीच्या ताब्यात दिलं. 19980 च्या दशकापर्यंत, पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे राहणारे भारतीय राजदूतही या मंदिरात पूजा करण्यासाठी येत असत.
पाकिस्तानमध्ये आहेत 20 – 22 श्रीकृष्ण मंदीर…
रावळपिंडी येथे असलेल्या मंदिराशिवात पाकिस्तानात अन्य मंदिरं देखील आहेत. जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरांमधील वातावरण फार सकारात्मक असतं. लाहोर बद्दल सांगायचं झालं तर, येथे 20 – 22 मंदिरं आहेत. पण पूजा फक्त दोन मंदिरांमध्ये केली जाते. एक कृष्ण मंदिर तर, दुसरा वाल्मिकी मंदिर…
केसरपुरा येथे कृष्ण मंदिर आहे, येथे जन्माष्टमीला योग्य पूजा केली जाते. अबोटाबादमध्ये श्रीकृष्णाचे एक प्रसिद्ध मंदिर देखील आहे, परंतु सध्या ते जीर्ण अवस्थेत आहे. या मंदिरात पूजा होत नाही, परंतु हिंदू भाविक मंदिरात पूजा करण्यासाठी येतात.
कराची येथील कृष्ण मंदिर
कराचीतील स्वामीनारायण मंदिरात हिंदू धर्माच्या नागरिकांसोबत मुस्लिमही भेट देतात. येथे हरे कृष्ण महाराज आणि राधा कृष्णदेव यांच्या मूर्ती आहेत. याशिवाय क्वेट्टा येथे एक इस्कॉन मंदिर आहे. 2007 मध्ये पाकिस्तान सरकारकडून जमीन खरेदी करून भगवान श्रीकृष्णासाठी एक मंदिर बांधण्यात आले. हे मंदिर देखील खूप प्रसिद्ध आहे.
