AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हमजा अजूनही पाकिस्तानातच, तिथे अजून एका मोठ्या दहशतवाद्याचा खेळ खल्लास, भारताचा कट्टर शत्रू हाफिद सईदला दणका

Hafiz Saeed : धुरंधर 2 द रिवेंज हा सिनेमा अजूनही थिएटरमध्ये आहे. प्रेक्षकांमध्ये हा सिनेमा तुफान हिट ठरला. या सिनेमात हमजा अली मजारी हा कथेचा मुख्य नायक पाकिस्तानात राहून भारताच्या शत्रुंना संपवतो असं दाखवण्यात आलं आहे. आता पाकिस्तानात पुन्हा एकदा अशीच एक मोठी घटना घडली आहे.

हमजा अजूनही पाकिस्तानातच, तिथे अजून एका मोठ्या दहशतवाद्याचा खेळ खल्लास, भारताचा कट्टर शत्रू हाफिद सईदला दणका
lashkar e taiba hafiz saeed
| Updated on: Apr 28, 2026 | 8:44 AM
Share

पाकिस्तानात पुन्हा एकदा अज्ञात हल्लेखोरांनी दहशतवाद्यांविरोधात मोहिम सुरु केली आहे. हे हल्लेखोर दहशतवाद्यांसाठी काळ बनून येत आहेत. पाकिस्तानात मागच्या तीन-चार वर्षात अशा रहस्यमयी हल्ल्यांमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला आहे. आता त्यात आणखी एका दहशतवाद्याचा समावेश झाला आहे. लश्कर-ए-तैयबाचा मुख्य चेहरा आणि हाफिज सईदचा निकटवर्तीय शेख यूसुफ अफ्रिदी यांची हत्या झाली आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. ही घटना खैबर पख्तूनख्वाच्या लांडी कोतल मध्ये झाली. इस्लामाबाद पासून हा भाग 250 किलोमीटर लांब आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही शस्त्र हल्लेखोरांनी शेख युसूफ आफ्रिदीवर अंदाधुंद गोळीबार केला. यात त्याचा जागीच मृ्त्यू झाला.

या हल्ल्याची अजूनपर्यंत कुठल्याही संघटनेने जबाबदारी घेतलेली नाही. या घटनेनंतर या भागात तणाव आणि संतापाचं वातावरण आहे. शेख युसूफ आफ्रिदीची लष्कर-ए-तैयबाच्या क्षेत्रीय रचनेत महत्वाची भूमिका होती. लश्कर-ए-तैयबावर बंदी आहे. आफ्रिदी खैबर पख्तूनख्वामध्ये संघटनेसाठी भरती आणि समन्वय ही कामं पहायचा. हाफिज सईदची दुसरी संघटना जमात-उद-दावाच्या प्रवक्त्याने आफ्रिदीला धार्मिक विद्वान म्हटलं. अहल-ए-हदीस विचारधारेचा तो मुख्य चेहरा होता. बरोबर एक आठवडाआधी लाहोरमध्ये आमिर हमजावर हल्ला झाला होता. यात तो जखमी झालेला. हमजाचा लष्कर-ए-तैयबाच्या संस्थापक नेत्यांमध्ये समावेश होतो.

याला ‘शॅडो वॉर’ म्हणतात

लष्करमध्ये हाफिज सईनंतर आमिर हमजा संघटनेत दुसरा मोठा चेहरा आहे. पाकिस्तानात 2023 पासून अज्ञात हल्लेखोरांकडून दहशतवाद्यांना टार्गेट करण्याचा सिलसिला कायम आहे. याला ‘शॅडो वॉर’ म्हटलं जातं. यात पाकिस्तानात बसून भारतविरोधी कारवाया करणारे 20 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले आहेत. यात  शाहिद लतीफ, परमजीत सिंह पंजवड, अदनान अहमद आणि मुफ्ती कैसर फारूक सारखे दहशतवादी आहेत.

पाकिस्तानातील दहशतवादी घाबरले

त्याशिवाय मोहम्मद ताहिर अनवरचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. या सर्व घटनांमध्ये एकसारखाच पॅटर्न आहे. आधी रेकी केली जाते. मग हल्लेखोर येतात. टार्गेटला संपवून लगेच निघून जातात. पाकिस्तान सरकार एकतर या घटनांवर मौन धारण करते किंवा आपसातील वैमनस्यातून मारले गेल्याचं कारण दिलं जातं. अशा प्रकारच्या हत्यांमुळे पाकिस्तानातील दहशतवादी घाबरले आहेत.

Follow Us
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल