Yoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार!

आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले. विशेष म्हणजे या दिवसाचे खास आणखीन महत्व वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहायाने M. Yoga हे अॅप लॉन्च करण्यात आले आहे.

Yoga Day 2021: आता जगात कुठेही असाल तरी M. Yoga app वरून योगाचे धडे घेता येणार!
पंतप्रधान नरेंद्र मोदी

मुंबई : आज (21 जून) आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित केले. विशेष म्हणजे या दिवसाचे आणखीन महत्व वाढवण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या सहायाने M. Yoga हे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे अॅप जगभरातील लोकांसाठी असणार आहे. या अॅपव्दारे आता जगभरातील लोक योगाचे धडे घेऊ शकणार आहेत. (Launch of M. Yoga app by Prime Minister Narendra Modi)

या अॅपचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभरातील विविध भाषांमध्ये आपण योगा शिकू शकतो. योगा करणे आपल्या आरोग्यासाठी किती महत्वाचे आहे, हे संपूर्ण जगाला कळले आहे. कारण कोरोनामध्ये आपल्या शरीराची ताकद आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगा फायदेशीर ठरला. एम. योगा अॅपची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एम. योगा अ‍ॅपव्दारे जगामध्ये योगाचा प्रसार आणि प्रचार होईल. वन वर्ल्ड वन हेल्थ या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी या अॅपमुळे मदत मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दर वर्षी 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून राज्यातील 2 हजार 700 पेक्षा अधिक ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत असतो. मात्र, यंदा कोरोनाचं संकट असल्याने कोणताही सार्वजनिक कार्यक्रम झाला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्तम आरोग्यासाठी योगसाधनेचे महत्व लोकांना समजणे आवश्यक आहे. 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो.

योगामुळे माणसाला दीर्घायुष्य मिळण्यास मदत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण केलं होतं. त्यावेळी त्यांनी योग दिनाचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर 2014 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत अन्य देशांनीही या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

संबंधित बातम्या : 

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, 81 दिवसांनी दिलासादायक बातमी

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठ्याचं नियंत्रण, डॉ. गुरुप्रसाद महापात्रा यांचं निधन, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

कोरोनाने दगावणाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये भरपाई देणे अशक्य: केंद्र सरकार

(Launch of M. Yoga app by Prime Minister Narendra Modi)