AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठ्याचं नियंत्रण, डॉ. गुरुप्रसाद महापात्रा यांचं निधन, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याचं नियंत्रण करणारे डॉ. गुरुप्रसाद महापात्रा (Dr. Guruprasad Mohapatra) यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं आहे

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठ्याचं नियंत्रण, डॉ. गुरुप्रसाद महापात्रा यांचं निधन, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
गुरुप्रसाद महापात्रा
| Edited By: | Updated on: Jun 19, 2021 | 4:56 PM
Share

नवी दिल्ली: उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाचे (DPIIT)सचिव डॉ. गुरुप्रसाद महापात्रा (Dr. Guruprasad Mohapatra) यांचं निधन झालं. केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी याबाबतची माहिती दिली. गुरुप्रसाद महापात्रा हे विमानतळ प्राधिकरणाचेही अध्यक्ष होते. विमानतळ प्राधिकरणाला नवी दिशा देण्यासाठी माहापात्रा यांनी मोठं काम केलं. महापात्रा यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. (DPIIT Secretary Guruprasad Mohapatra Passed away due to post covid complications PM Modi express grief)

दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन पुरवठ्याचं नियंत्रण करणारे डॉ. गुरुप्रसाद मोहपात्रा  यांचं दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झालं आहे. कोरोना बरा झाल्यानंतर प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांचं निधन झालं. डॉ.गुरुप्रसाद महापात्रा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

गुरुप्रसाद महापात्रा यांच्या निधनामुळे दु:ख झालं. मी त्यांच्यासोबत गुजरात आणि केंद्र सरकारमध्ये काम केल आहे. प्रशासकीय समस्या सोडवण्याची त्यांना चांगली जाण होती. नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी ते ओळखले जायचे. मोहपात्रा यांच्या कुटुंबीयांसोबत संवेदना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

गुरुप्रसाद महापात्रा यांची कारकीर्द

गुरुप्रसाद महापात्रा हे 1986 च्या बॅचचे गुजरात केडरचे आयपीएस अधिकारी होते. 19 एप्रिल रोजी ते कोरोना बरा झाल्यानंतर झालेल्या प्रकृतीच्या समस्येमुळे एम्समध्ये दाखल झाले होते. पुढील वर्षी 30 एप्रिल 2022 रोजी ते सेवानिवृत्त होणार होते. गुजरातमधील सुरत महापालिकेमध्ये त्यांनी 1999-2002 या कालावधीमध्ये आयुक्त म्हणून देखील काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी एअरपोर्ट अ‌ॅथॉरिटी ऑ इंडियाचं चेअरमनपद भूषवलं. अहमदाबाद महापालिकेचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केलं होतं. साबरमती नदी प्रकल्प, बीआरटीएस, कनकारिया लेक फ्रंट आदी प्रक्लपांच्या विकासकामात महापात्रा यांचं योगदान होतं.

पियुष गोयल यांच्याकडून दु:ख व्यक्त

केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी डॉ.गुरुप्रसाद महापात्रा  यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. गुरुप्रसाद महापात्रा यांनी देशाची सेवा मोठ्या समर्पणाच्या भावनेतून केली, अशा शब्दांत गोयल यांनी महापात्रा यांना आदरांजली वाहिली.

संबंधित बातम्या:

Gold Rate Today : जळगावात सोनेदरात तब्बल दीड हजारपेक्षा अधिक रुपयांनी घसरण, तोळ्याचा भाव किती?

लॉकडाऊन पूर्णपणे हटवणारं पहिलं राज्य, ‘या’ राज्याने संपूर्ण लॉकडाऊन हटवला

(DPIIT Secretary Guruprasad Mohapatra Passed away due to post covid complications PM Modi express grief)

महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.