AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PM Modi in Maldive : भाऊंचा दणकाच असा की….मालदीवच सगळं कॅबिनेट PM मोदींच्या स्वागताला एअरपोर्टवर उतरलं VIDEO

PM Modi in Maldive : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन देशांच्या दौऱ्यावर आहेत. ब्रिटन नंतर ते मालदीवला जाणार आहेत. याच मालदीव बरोबर दोन वर्षांपूर्वी तणाव निर्माण झालेला. पण आता परिस्थिती बदलली आहे. नव्या भारताशी पंगा घेणं काय असतं ते आता मालदीवला कळून चुकलय.

PM Modi in Maldive : भाऊंचा दणकाच असा की....मालदीवच सगळं कॅबिनेट PM मोदींच्या स्वागताला एअरपोर्टवर उतरलं VIDEO
PM Modi in MaldiveImage Credit source: ANI
| Updated on: Jul 25, 2025 | 11:32 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनचा दौरा संपवून मालदीवला पोहोचले आहेत. शुक्रवारी सकाळी ते राजधानी मालेमध्ये दाखल झाले. विमानतळावर पीएम मोदींच्या स्वागताला राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू स्वत: जातीने हजर होतेच. पण अख्ख मंत्रिमंडळ मोदींच्या स्वागतासाठी तिथे आलेलं. राष्ट्रपती मुइज्जू यांनी पीएम मोदींची गळाभेट घेऊन त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांचं अख्ख कॅबिनेट मोदींच्या स्वागताला विमानतळावर हजर होतं. मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांपासून ते संरक्षण मंत्री, अर्थ मंत्री आणि होमलँड सिक्युरिटीचे मंत्री त्यात होते.

पीएम मोदी राष्ट्रपती मुइज्जू यांच्या निमंत्रणावरुन मालदीवला गेले आहेत. मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आलेलं आहे. याच वर्षी भारत आणि मालदीवच्या राजनैतिक संबंधांना 60 वर्ष पूर्ण होत आहेत.

इंडिया आऊटचा नारा दिलेला

मालदीव आणि भारताची मैत्री दक्षिण आशियामधील सर्वात महत्त्वाची रणनितीक भागीदारी मानली जाते. दोन वर्षांपूर्वी दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते. याला मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू जबाबदार होते. त्यांनी मालदीवची सत्ता मिळवण्यासाठी इंडिया आऊटचा नारा दिला होता. त्यावेळी अनेक एक्सपर्टना वाटलेलं की, भारताने आपल्या जवळच्या समुद्र भागीदाराला गमावलं आहे.

पीएम मोदींच्या कूटनितीला यश

काहीजण याला भारतासाठी झटका म्हणत होते. काहीजण दोन्ही देशांच्या भविष्याबद्दल चिंतित होते. पण या उलट झालं. पीएम मोदी यांनी कूटनिती आणि Soft Diplomacy च्या बळावर भारताच महत्त्व मालदीवच्या नव्या नेतृत्वाच्या लक्षात आणून दिलं. डॉ. मोइज्जु यांना सुद्धा समजलं की, चीनच्या तुलनेत भारत अधिक विश्वासू आणि संकट काळातील सच्चा भागीदार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कितवा दौरा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा तिसरा मालदीव दौरा आहे. मोदी 2018 साली पहिल्यांदा राष्ट्रपती सोलिह यांच्या शपथ ग्रहणाच्यावेळी मालदीवला गेले होते. त्यानंतर 2019 साली पीएम मोदी यांनी मालदीवचा द्विपक्षीय दौरा केला. आता पीएम मोदी राष्ट्रपती मुइज्जू यांच्या निमंत्रणावरुन मालदीवला चालले आहेत. मालदीवच्या 60 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होणार आहेत. पंतप्रधान मोदींचा मालदीव दौरा चीनसाठी एक संदेश असणार आहे. कारण चीन भारताच्या या जुन्या मित्राला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करत होता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.