AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेक्स करता करता तो अती उत्साहीत झाला अन् थेट ढगात गेला!

मोबाईलवर पॉर्न फिल्म बघून वेगवेगळ्या प्रकारे शाररिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात एका तरुणाला गळफास लागून त्याचा मृत्यू झाल्याची एक घटना नुकतीच नागपुरात घडली होती.

सेक्स करता करता तो अती उत्साहीत झाला अन् थेट ढगात गेला!
| Edited By: | Updated on: Jul 12, 2021 | 11:35 AM
Share

मुंबई : मोबाईलवर पॉर्न फिल्म बघून वेगवेगळ्या प्रकारे शाररिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात एका तरुणाला गळफास लागून त्याचा मृत्यू झाल्याची एक घटना नुकतीच नागपुरात घडली होती. आता अशीच अजून एक बातमी समोर आली आहे. या घटनेत सेक्सदरम्यान परमोच्च सुखाच्या क्षणापर्यंत (extreme orgasm) पोहोचलेल्या एका पुरुषाचा मृत्यू झाला आहे. ही घटना मलावी या देशातील फालोम्बे येथी घडली आहे. (Man Dies During Sex, Extreme Orgasm Determined as the Cause of Death)

चार्ल्स माजवा (35) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याचा गुढ मृत्यू झाल्याची सुरुवातीला चर्चा होती. परंतु चार्ल्सच्या शवविच्छेदन अहवालामध्ये शरीरसंबंध ठेवताना ही व्यक्ती अती उत्साहीत झाल्याचे म्हटले आहे. या व्यक्तीचा मृत्यू समागमाच्या वेळी (सेक्सदरम्यान) शिगेस पोहचलेल्या उत्कटतेमुळे म्हणजेच एक्सट्रीम ऑरगॅझममुळे झाल्याचे नमूद करण्यात आलं आहे. एका शरीरविक्रय करणाऱ्या (कॉल गर्ल) महिलेसोबत सेक्स करत असतानाच या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

एक्सट्रीम ऑरगॅझमवेळी (परमोच्च सुखाच्या क्षण) चार्ल्सचा मृत्यू झाल्याचे त्याच्या शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. द सन नावाच्या एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, समगमावेळी जेव्हा चार्ल्स परमोच्च सुखाच्या क्षणापर्यंत पोहोचला आणि त्यानंतर तसाच पडून राहिला. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या कॉलगर्लला वाटले की समागमानंतर मिळालेल्या आनंदामुळे तो आता शांतपणे पडला आहे. परंतु काही वेळाने तिच्या लक्षात आले की त्याचा मृत्यू झाला आहे.

चार्ल्सची शुद्ध हरपल्यानंतर ती कॉलगर्ल महिला घाबरली आणि तिने तिच्या मैत्रिणीला यासंदर्भात कळवलं. त्यानंतर या महिलेने घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आरोग्य पथकासोबत घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. या शवविच्छेदन अहवालामध्ये एक्सट्रीम ऑरगॅझममुळे या व्यक्तीच्या मेंदूमधील नसा फुटल्याचे नमूद करण्यात आलं आहे.

पोलिसांनी या घटनेप्रकरणी संबंधित कॉलगर्लता ताब्यात घेतले होते. परंतु शवविच्छेदनाचा अहवाल समोर आल्यानंतर पोलिसांनी या घडलेल्या घटनेसाठी संबंधित महिलेला दोषी ठरवता येणार नाही असं म्हटलं आहे. तसेच या प्रकरणात कोणाविरोधातही खटला चालवला जाणार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केले आहे. चार्लसचा मृतदेह त्याच्या मूळ गावी म्हणजेच मातेप्वी येथे नेण्यात आला असून तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

इतर बातम्या – 

सेक्स करताना झाला तरुणाचा मृत्यू, नागपूरमधल्या घटनेत प्रेयसीवर गुन्हा दाखल

नाशकात चाकूचा धाक दाखवून अल्पवीन मुलीवर सामूहिक बलात्कार; 7 नराधमांच्या मुसक्या आवळल्या

(Man Dies During Sex, Extreme Orgasm Determined as the Cause of Death)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.