AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सत्तेत येताच ट्रम्प यांचा ‘मोदी पॅटर्न’, सोमालियात एअर स्ट्राइक; गुहेत शिरून दहशतवाद्यांचा खात्मा

सोमालियात आयसिस अतिरेक्यांवर राष्ट्रपती ट्रम्प यांनी हवाई हल्ला करण्याचा आदेश दिला. या कारवाईत अनेक अतिरेकी ठार झाले असून, गुप्त ठिकाणी लपलेल्या अतिरेक्यांनाही लक्ष्य केले गेले. ट्रम्प यांनी या कारवाईची माहिती ट्रूथ सोशलवर दिली आहे. या हल्ल्यात कोणताही नागरिक हानी झाली नसल्याचा दावा पेंटागॉनने केला आहे.

सत्तेत येताच ट्रम्प यांचा 'मोदी पॅटर्न', सोमालियात एअर स्ट्राइक; गुहेत शिरून दहशतवाद्यांचा खात्मा
donald trump Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Feb 02, 2025 | 12:18 AM
Share

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाची सूत्रे हाती घेताच मोदी पॅटर्न अवलंबला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राइक करून पाकिस्तानी अतिरेक्यांना जसं सळो की पळो करून सोडलं होतं, तसंच कित्ता डोनाल्ड ट्रम्प यांनी गिरवला आहे. अमेरिकेच्या सैन्याने सोमालियात घुसून आयसिसच्या तळांवर हल्ले चढवले आहेत. या एअर स्ट्राइकमध्ये अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. विशेष म्हणजे गुहेमध्ये शिरून अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. अमेरिकेच्या या सर्वात मोठ्या कारवाईमुळे सोमालियात एकच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी एअर स्ट्राइकची माहिती दिली आहे. आज सकाळी (शनिवारी) मी आयसिसचे सीनिअर अटॅकर आणि त्यांच्याद्वारे सोमालियात भरती करण्यात आलेल्या दहशतवाद्यांवर एअर स्ट्राइक करण्याचा आदेश दिला होता. हे दहशतवादी गुहेत लपले होते. पण आम्ही त्यांच्यावर जवळून हल्ला केला. सोमालियातील हे दहशतवादी अमेरिकाच नव्हे तर आमच्या सहकाऱ्यांसाठीही घातक होते, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय.

गुहा उद्ध्वस्त

एअर स्टाइकमध्ये अनेक अतिरेक्यांना ठार करण्यात आलं आहे. तसेच हवाई हल्ल्यातून दहशतवाद्यांच्या गुहा उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत. या गुहेत अतिरेकी लपून बसले होते. इथूनच हे अतिरेकी त्यांच्या कारवाया करत होते. या हल्ल्यात फक्त अतिरेकी मारले गेले आहेत. एकाही सामान्य नागरिकाच्या केसालाही धक्का लागला नाही, असं ट्रम्प यांनी म्हटलंय.

आम्ही शोधून मारू

आमची सेना आयसिस हल्ल्याचा प्लान आखणाऱ्या अनेक दहशतवाद्यांना टारगेट करत होती. पण बायडेन आणि त्यांचे सहकाऱ्यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी इतक्या तत्परतेने अॅक्शन घेतली नसती. पण मी ते करून दाखवलं आहे. आयसिस आणि अमेरिकेवर हल्ला करणाऱ्यांना आम्ही यातून एक संदेश दिलाय. आम्ही तुम्हाला शोधून काढू आणि मारून टाकू, हाच संदेश आम्ही दिला आहे, असं ट्रम्प यांनी म्हटलंय. ट्रम्प सत्तेत आल्यानंतर अमेरिकन सैन्याने केलेली ही पहिलीच कारवाई आहे.

एकाही नागरिकाला नुकसान नाही

अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकन सैन्याच्या आफ्रिकन कमान द्वारे करण्यात आलेल्या हल्ल्याचे निर्देश ट्रम्प यांनी दिले होते. त्यासाठी सोमालिया सरकारशी समन्वय साधण्यात आला होता. पेंटागॉनद्वारे करण्यात आलेल्या सुरुवाती माहितीनुसार या हल्ल्यात अनेक अतिरेकी मारले गेले आहेत, असं हेगसेथ यांनी म्हटलंय. तर या हल्ल्यात एकाही नागरिकाला कोणत्याही प्रकारचं नुकसान झालं नसल्याचं पेंटागॉनने म्हटलंय.

डोंगरात लपले होते

दरम्यान, सोमालिया आफ्रिकन देशात झालेल्या अनेक हल्ल्याला आयसिस जबाबदार आहे. आंतरराष्ट्रीय ग्रुप्सच्या अनुसार, सोमालियामध्ये आयसिस दहशवाद्यांची संख्या शेकडोंनी आहे. यातील बहुतेक अतिरेकी हे पुंटलँडच्या बारी परिसरात कैल मिस्काट डोंगरात लपले होते.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.