AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोन्याच्या खाणीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू, खळबळ उडवणारी घटना, अनेकजण अजूनही..

सोन्याच्या खाणीत कामगार काम करत असताना मोठी दरड कोसळली. ज्यानंतर तब्बल 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. अजूनही बचावकार्य राबवले जात आहे. मोठा चिखल असल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

सोन्याच्या खाणीत 100 हून अधिक जणांचा मृत्यू, खळबळ उडवणारी घटना, अनेकजण अजूनही..
Gold mine
| Updated on: Aug 21, 2026 | 8:00 AM
Share

नुकताच मोठी धक्कादायक घटना घडली. सोन्याच्या खाणीत मोठी दरड कोसळली. ज्यामध्ये आतापर्यंत तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू झाला. अजूनही मोठ्या प्रमाणात लोक आतमध्ये अडकली आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकाच्या (CAR) पश्चिम भागातील एका छोट्या गावात ही घटना घडली. हाताने खणल्या जाणाऱ्या सोन्याच्या खाणीत दरड कोसळल्याने 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. बचावकार्याकडून अजूनही लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ही घटना कॅमेरूनच्या सीमेजवळ बाबुआ शहरापासून सुमारे 50 किलो मीटर अंतरावर घडली. कामगार खाणीत असताना मोठी दरड कोसळली. कामगारांना बाहेर येण्याची संधीही मिळाली नाही. अजूनही बचावकार्य सुरू असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

यादरम्यान काहीजण जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्या खाणीत काम करून हे लोक पोट भरत होते, त्यांचा उदरनिर्वाह या खाणीतून होत होता, तीच खाण आता मृत्यूचे कारण बनली. ढिगाऱ्याखाली अजूनही लोक अडकली आहेत. त्यांना बाहेर काढले जातंय. मोठा चिखल आणि ढिगारा असल्याने बचावकार्यात समस्या निर्माण होत आहे.

अजूनही काहीजण खाणीत अडकली आहेत. मात्र, मोठा चिखल असल्याने बचाव करणाऱ्यांना खाणीत आत जाणे शक्य होत नाही. खाणीत अडकलेले लोक जिवंत असतील याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. स्थानिक लोकही मलबा हटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ढिगारा बाजूला सारून लोकांचा शोध घेतला जात आहे. लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथके आणि स्थानिक नागरिक हाताला चिखल बाजूला करत आहेत.

मिळालेल्या अधिकची माहिती अशी की, ही एक लहान सोन्याची खाण आहे. तिथे सोन्याचे उत्खनन केले जाते. स्थानिक लोकच खोदकाम करून सोने काढतात. येथील लोकांचे उत्पन्नाचे साधन सोन्याच्या खाणी आहे. लोक याच खाणीत काम करून पोट भरतात. काही ठिकाणी अवजारांनी खोदकाम केले जाते, ज्यामुळे धोका निर्माण होतो. ही घटना तशीच असल्याचे सांगितले जातंय. अवजारांनी खोदकाम सुरू असतानाच थेट दरड कोसळली.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...