
Terrorist Women Brigade : एप्रिलच्या अखेरच्या टप्प्यात पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर मे महिन्यात भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. भारताने पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचे कंबरडे मोडले. पाकव्याप्त काश्मिरसह पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणं उद्धवस्त केली होती. जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेचे तीन तेरा वाजले. तर या संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरची मोठी नाचक्की झाली. त्यामुळे आता ऑपरेशन सिंदूरचा बदला घेण्यासाठी मौलाना संधी शोधत आहे. त्यासाठी त्याने टेरर प्लॅन आखला आहे.
महिला दहशतवादी ब्रिगेड
ऑपरेशन सिंदूरचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये म्हणजे या ऑपेरशनमध्ये महिला शक्ती दिसली होती. लेफ्टनंट कर्नल सोफिया कुरेशी आणि भारतीय वायुदलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी या ऑपरेशनमध्ये सहभाग नोंदवला होता. या सर्व मोहिमेची माहिती या दोघींनीच पत्रकार परिषदेद्वारे दिली होती. त्यामुळे पाकची आयएसआय, पाक लष्कर आणि मौलान मसूदला चांगल्याच मिरच्या झोंबल्या.
भारताला जशाच तसे उत्तर देण्यासाठी मसूदने महिला दहशतवादी तयार करण्याची योजना आखली आहे. पाकिस्तानच्या प्रत्येक जिल्ह्यात महिला दहशतवादी आणि त्यांना प्रशिक्षण देणारं केंद्र उभारण्यात येत आहे. अर्थात त्याला पाक लष्कराची रसद असेल यात शंका नाही. पाकिस्तानमधील अधिकाधिक महिलांना या दहशतवादी कॅम्पमध्ये आणण्याची जबाबदारी जैशच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर टाकण्यात आली आहे.
पाकमध्ये विष कन्या
मसूदची बहीण सादिया अजहर हिच्या नेतृत्वात पाकच्या प्रत्येक जिल्ह्यात भारताविरोधात विष कन्या तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना पैशापासून ते जन्नतपर्यंत सर्व प्रकारची आमिषं दाखवण्यात येत आहेत. पुरूषां 72 हुरांचे स्वप्न दाखवण्यात येत आहे. तर या महिलांना जन्नतची शपथ देण्यात येत आहे. पुरुषांसाठी दौरा-ए-तरबियत हे प्रशिक्षण केंद्र आहे. तर महिलांसाठी दौरा-ए-तस्किया हे प्रशिक्षण केंद्र आहे. त्यानंतर महिलांना दौरा-आयत-उल-निसाह यामध्ये जिहादचे प्रशिक्षण देण्यात येईल. या महिलांना भारतामध्ये विविध मार्गे घुसवण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यामध्ये सुंदर स्त्रीयांच्या भरतीवर अधिक जोर देण्यात येत आहे. या महिला विष कन्या म्हणून काम करतील. त्या वेळप्रसंगी जिहादसाठी प्राण देतील असे मसूदने जाहीर केले आहे. त्याची 21 मिनिटांची ऑडिओ क्लिप सध्या पाकिस्तानच्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली आहे. तर याविषयीचे पत्रकही समोर आल्याचा दावा करण्यात येत आहे. आयसिस आणि बोको हराम या संघटना गुलाम महिलांचा वापर हा बॉम्बर म्हणून करतात. तर काही आत्मघातकी महिला पथकंही त्यांच्यात सहभागी आहेत. तसेच एक पथक जैश-ए-मोहम्मद तयार करत आहे.