भारत – इस्रायलमध्ये सर्वाधिक धर्मांचा उगम, जाणून घ्या कारण..
हिंदू धर्म, बौद्ध, जैन, शीख, यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांचा जन्म भारत आणि मध्यपूर्वेत झाला. या ठिकाणी गहन आध्यात्मिक शोध, बौद्धिक वाद आणि सामाजिक-राजकीय बदल झाले ज्यामुळे अनेक धर्मांची भरभराट झाली. याविषयी पुढे जाणून घ्या.

जगातील बहुतेक प्रमुख धर्मांचा उगम भारत आणि मध्यपूर्वेत झाला. मध्यपूर्व म्हणजे इस्रायल, सौदी अरेबिया आणि आजूबाजूचा प्रदेश. हिंदू, बौद्ध, जैन, शीख, यहुदी, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांची भरभराट या प्रदेशात झाली. बहुतेक प्रमुख धर्मांचा उगम भारतीय उपखंडात आणि मध्यपूर्वेत झाला आहे किंवा त्यांची मुळं इथेच झाली आहेत, हा योगायोग आहे का? किंबहुना हे प्रदेश त्यांच्या गहन आध्यात्मिक कार्यामुळे, बौद्धिक वादांमुळे आणि नव्या धर्मांना जन्म देणाऱ्या सामाजिक-राजकीय बदलांमुळे धर्मांचे ‘जनक’ बनले. भारत हा हजारो वर्षांपासून धार्मिक विविधतेचा देश आहे. हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख या चार धर्मांचे हे जन्मस्थान आहे. त्यात आलेले इस्लाम आणि...