AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel युद्ध थांबलय कुठे? Mossad च खतरनाक जाळं, 12 तासात अख्ख्या इराणला हादरवलं

Iran Israel : मागच्या आठवड्यात झालेल्या स्फोटानंतर इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले की, "इस्रायलचे हात खामेनेईपर्यंत पोहोचू शकतात. मग ते तेहरानमध्ये असोत, तबरीज किंवा इस्फहानमध्ये" याचा अर्थ स्पष्ट आहे, इराणमध्ये इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेच ऑपरेशन सुरु आहे. इराणी डिफेन्स फोर्सेसच्या ठिकाणी हे स्फोट होत आहेत.

Iran Israel युद्ध थांबलय कुठे? Mossad च खतरनाक जाळं, 12 तासात अख्ख्या इराणला हादरवलं
Iran Israel
| Updated on: Jul 16, 2025 | 9:38 AM
Share

इराण-इस्रायलमध्ये मागच्या महिन्यात भीषण युद्ध झालं. 12 दिवसानंतर हे युद्ध थांबलं. पण त्यानंतर आता पुन्हा एकदा इराणमध्ये कारवाया सुरु झाल्या आहेत. इराणच्या वेगवेगळ्या शहरात एकाच दिवसात अनेक स्फोट झाले. यात अणू प्रकल्प असलेली काही शहरं आहेत. रिपोर्टनुसार, काही ठिकाणी इराणला आपली एअर डिफेन्स सिस्टिम एक्टिवेट करावी लागली. स्फोट एकाच पॅटर्नमध्ये झाले. इराणने सुरुवातीला स्फोटाचं कारण गॅस लीक असल्याच सांगितलं. पण पहिल्या स्फोटानंतर इस्रायलने फारसी भाषेत सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यानंतर या रहस्यमयी स्फोटांच संपूर्ण प्रकरण संशयास्पद वाटू लागलं. या स्फोटांमागे काय आहे? त्या बद्दल जाणून घेऊया.

सर्वप्रथम पहिला स्फोट इराणच्या कोम शहरात झाला. या स्फोटात एक हाऊसिंग कॉम्पलेक्स नष्ट झालं. स्फोटाच कारण गॅस गळती असल्याच इराणकडून सांगण्यात आलं. कोमसह अन्य शहरातून स्फोटांच्या बातम्या आणि फोटो येऊ लागले. तेहरानच्या खतम अल अनबिया येथे आग लागली. मशहादच्या एका अपार्टमेन्टमध्ये स्फोटानंतर आग लागली. तबरीजमध्ये स्फोटानंतर इराणची एअर डिफेन्स सिस्टिम एक्टिवेट करावी लागली.

इस्रायलने सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हटलेलं?

तबरीजनंतर करजमध्ये स्फोट झाले. इराणकडून स्फोटाच कारण गॅस गळती असल्याच सांगण्यात आलं. त्यानंतर इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिलं की, “इराण दिवाळखोर दहशतवादी संघटनांना कोट्यवधी डॉलर देतो. त्याऐवजी त्यांनी त्या पैशातून आपल्या गॅस पाइपलाइनची दुरुस्ती करुन घेतील असती, तर चांगलं झालं असतं”

इराणच म्हणणं काय?

मागच्या महिन्यात सीजफायर झाल्यानंतर इराणमध्ये आग आणि स्फोटाच्या घटना सतत सुरु आहेत. इराण या स्फोटांसाठी खराब गॅस पाइपलाइन्सना जबाबदार ठरवत आहे. पण कोममध्ये झालेल्या स्फोटानंतर काही तासात पश्चिम तेहरानच्या अल-अनबिया अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली. इथे रिवोल्यूशनरी गार्ड कोर IRGC च मुख्यालय आहे.

इराणध्ये हे स्फोट कुठे होतायत?

मागच्या आठवड्यात तेहरानमध्ये इराणी आर्म्ड फोर्सेसच्या ज्यूडिशियल विंगमध्ये आग लागली. तेहरानने यामागे सुद्धा गॅस गळतीच कारण दिलं. त्यानंतर काहीतासात इराणने IRGC चे माजी कमांडर अली तैयब यांच्या मृत्यूची घोषणा केली. इराणमध्ये जिथे आग लागतेय किंवा स्फोट होतायत, ते इराणी आर्म्ड फोर्सेस आणि IRGC ची ठिकाणं आहेत. म्हणून संशय बळावत चालला आहे. इराण या स्फोटांच सत्य लपवत आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.