चंद्राच्या पृष्ठभागावर सापडलं पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांची मोठी घोषणा

चंद्राच्या शीत आणि अंधाऱ्या प्रदेशातही पाणी असण्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. | NASA

चंद्राच्या पृष्ठभागावर सापडलं पाणी; नासाच्या शास्त्रज्ञांची मोठी घोषणा

न्यूयॉर्क: चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा साठा आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेने ही माहिती दिली आहे. त्यानुसार सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणाऱ्या चंद्रांच्या पृष्ठभागावर पाण्याचे साठे आढळून आले आहेत. त्यामुळे चंद्राच्या उर्वरित पृष्ठभागावरही विखुरलेल्या स्वरुपात पाण्याचे साठे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चंद्राच्या शीत आणि अंधाऱ्या प्रदेशातही पाणी असण्याचा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. (Water found of surface of moon)

आम्हाला सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येत असलेल्या चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी उपलब्ध असल्याचे संकेत मिळाले आहेत. हा शोध लागल्यामुळे चंद्राविषयी आपल्याकडे आजपर्यंत उपलब्ध असलेल्या माहितीला नवे आव्हान मिळाले आहे. तसेच अंतराळ संशोधनातील कुतूहल आणखीनच वाढल्याचे मत ‘नासा’चे शास्त्रज्ञ पॉल हर्टझ यांनी मांडले.

नासाचा हा शोध अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे. यामुळे आता चंद्राच्या अंधाऱ्या आणि शीत भागाविषयीची कुतूहल आणखी वाढले आहे. या प्रदेशात पाण्याचे आणखी मोठे साठे सापडण्याची शक्यता आहे. एका अहवालानुसार नेहमी अंधारात असणाऱ्या चंद्राच्या पृष्ठभागावरील तब्बल 40 हजार स्क्वेअर मीटर परिसरात पाणी असू शकते. पाण्याच्या उपलब्धतेमुळे एखादे यान चंद्रांवर गेल्यास अंतराळवीरांना या पाण्याचा वापर करता येऊ शकेल. तसे झाल्यास भविष्यात चंद्रावरील अंतराळ मोहिमा दीर्घकाळापर्यंत सुरु ठेवता येऊ शकतात.

इतर बातम्या:

चंद्रावर ‘प्रज्ञान रोव्हर’ अजून सुस्थितीत? – चेन्नईचे इंजिनिअर सुब्रमण्यन यांचा दावा

अबब…! पुण्याच्या महिलेची चक्क चंद्रावर जमीन खरेदी

चंद्रयान 2 मधील दोन्ही रोव्हरचा शोध लागला, एकाने जागा बदलली, NASA चे फोटो ट्विट करत तंत्रज्ञाचा दावा

(Water found of surface of moon)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *