पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानाच्या घरचं लग्न आणि भारतीयांची एन्ट्री… शत्रू राष्ट्रात संतापाचं वातावरण

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानाच्या नातवाच्या बायकोने भारतीय कपडे घातल्यामुळे शत्रू राष्ट्रात संतापाचं वातावरण आहे... सध्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानाच्या घरचं लग्न आणि भारतीयांची एन्ट्री... शत्रू राष्ट्रात संतापाचं वातावरण
| Updated on: Jan 19, 2026 | 2:26 PM

भारत आणि पाकिस्तान मधील संबंध कायम संवेदनशील राहिले आहेत. फाळणी झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये अनेकदा वातावरण तापलं होतं. एप्रिल 2025 मध्ये पहलगाम हल्ल्यानंतर परिस्थिती आणखी बिकट झाली आणि दोन्ही देश युद्धाच्या जवळ असल्याचं चित्र होतं… आता पाकिस्तान एका वेगळ्या कारणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ याच्या कुटुंबातील लग्नाच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर सर्वत्र रंगल्या आहेत. पण यामुळे पाकिस्तानात वादग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे.

रंगणाऱ्या चर्चांमागे कारण आहे, नवरीचे कपडे… नवरीचे लग्नात पाकिस्तानी पद्धतीचे नाही तर, भारतीय कपडे घातल्यामुळे वाद निर्माण झाले. ज्यामुळे सोशल मीडियावर अनेकांना नाराजी देखील व्यक्त केली आहे. नवरीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवाज शरीफ याचे नातू जुनैद सफदर याने लाहोरमध्ये शांजेह अली रोहेलशी लग्न केले. जरी हे लग्न खाजगी असलं तरी वधूच्या पोशाखाने राजकीय आणि सामाजिक वादविवादाला तोंड फोडलं आहे. सांगायचं झालं तर, जुनैद सफदर हा पाकिस्तानच्या पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ आणि पाकिस्तानच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असलेल्या संसद सदस्य मोहम्मद सफदर अवान याचा पुत्र आहे.

 

 

जुनैद सफदर याचं हे दुसरं लग्न आहे. जुनैद याचं पहिलं लग्न 2021 मध्ये आयेशा सैफ खान हिच्यासोबत झालं होतं. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 2023 मध्ये जुनैद आणि आयेशा यांचा घटस्फोट झाला. जुनैद याच्या दुसऱ्या लग्नानंतर कुटुंबाच्या आनंदापेक्षा वधूच्या पोशाखाची जास्त चर्चा सुरू झाली, ज्यामुळे सोशल मीडियावर वादविवादाला सुरुवात झाली.

मेहंदी समारंभाला शांजेह अली हिने भारतीय डिजायनर सब्यसाची मुखर्जी यांनी तयार केलेला लेहेंगा घातला होता. ज्यामध्ये सोनेरी जरीकाम होतं आणि दुहेरी दुपट्टा होता. अशात युजर्सने प्रश्न उपस्थित केला आहे की, एका राजकीय कुटुंबातील सुनेनं पाकिस्तानी डिझायनर्सऐवजी भारतीय डिझाईन्स का निवडल्या?

सोशल मीडियावर पाकिस्तानी नागरिकांचा संताप…

एक नेटकरी म्हणाला, ‘पाकिस्तानी नेताच सर्वात मोठा भारतीय समर्थक दिसत आहे.’ तर दुसरा नेटकरी म्हणाला, ‘पाकिस्तानी डिझायनर देखील चांगले कपडे बनवू शकतात…’ तर अनेकांनी नव्या नवरीचं समर्थन देखील केलं. अनेक नेटकरी म्हणाले, ‘खासगी पद्धतीत लग्न झालं आहे आणि तिला तिच्या आवडीचे कपडे घालण्याचा पूर्ण अधिकार आहे.’