Nepal Violence : भारतीय जोडप्याने चौथ्या मजल्यावरुन बिछान्याच्या दिशेने उडी मारली, पण…नेपाळमधील त्या रात्रीची दुर्देवी घटना
Nepal Violence :नेपाळमधल्या हिंसाचारात घडलेली ही दुर्देवी घटना आहे. नेपाळमधल्या या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी झाली. नेपाळमधल्या या हिंसाचाराची तिथे गेलेल्या भारतीय पर्यटकांना झळ बसली आहे. अशाच एका दुर्देवी घटनेत भारतीय महिला पर्यटकाचा मृत्यू झाला आहे.

नेपाळमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात मोठ आंदोलन झालं. तिथे जाळपोळ, हिंसाचार झाला. अवघ्या दोन दिवसात नेपाळमध्ये सरकार उलथवण्यात आलं. नेपाळमधल्या या हिंसाचारात मोठ्या प्रमाणात जिवीत व वित्तहानी झाली. अनेक हॉटेल्सना आगी लावण्यात आल्या. नेपाळमधल्या या हिंसाचाराची तिथे गेलेल्या भारतीय पर्यटकांना झळ बसली आहे. अशाच एका दुर्देवी घटनेत भारतीय महिला पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशच्या महराजगंज जवळ इंडो-नेपाल बॉर्डरवर गाजियाबादच्या महिलेचा मृतदेह तिच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. नेपाळमधल्या हिंसाचारात घडलेली ही दुर्देवी घटना आहे. गाजियाबादमधून एक जोडपं काठमांडूच्या पशुपति नाथ मंदिरात दर्शनासाठी गेलं होतं. हे जोडपं ज्या हॉटेलमध्ये उतरलं होतं, तिथे आंदोलकांनी आग लावली. हॉटेलला आग लागल्यानंतर जीव वाचवण्यासाठी या जोडप्याने चौथ्या मजल्यावरुन उडी मारली. त्यात ते जखमी झाले. हॉटेलमध्ये हिंसक जमाव घुसल्यानंतर या पती-पत्नीची परस्परापासून ताटातूट झाली होती.
बुधवारी या जोडप्याच्या मुलाला समजलं की, आपली आई आता या जगात राहिलेली नाही.गाजियाबादच्या नंदग्राम क्षेत्रातील मास्टर कॉलोनीमध्ये राहणारे रामवीर सिंह गोला 7 सप्टेंबर रोजी 55 वर्षीया पत्नी राजेश गोला सोबत पशुपतिनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. भगवान पशुपतिनाथ यांचं दर्शन घेतल्यानतंर पति-पत्नी काठमांडू स्थित हयात रेजीडेंसी हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी रात्री 11.30 च्या सुमारास उपद्रवींनी हॉटेलला आग लावली. हॉटेलच्या आगीत फसलेल्या जोडप्याने जीव वाचवण्यासाठी चौथ्या मजल्यावरुन उडी मारली.
पती-पत्नीची एकमेकापासून ताटातूट
बचाव पथकाच्या प्रयत्नामुळे अनेक लोक आधीपासून अंथरलेल्या बिछान्यावर पडल्यामुळे वाचले. पण गाजियाबादच हे जोडपं जखमी झालं. या दरम्यान उपद्रवींनी पुन्हा हल्ला केला. या गडबडीत पती-पत्नीची एकमेकापासून ताटातूट झाली. बुधवारी नेपाळमधून रामवीर सिंह यांचा मुलगा विशालला फोन कॉल आला की, उपचारादरम्यान त्याच्या आईचा मृत्यू झालाय. वडिल रामवीर सिंह दोन दिवसांनी जखमी अवस्थेत मदत शिबीरात सापडले. इंडो-नेपाल बॉर्डरवर सोनौली येथे मृतदेह आणण्यासाठी आलेले राजेश गोला यांच्या नातेवाईकांनी सांगितलं की, जखमी झाल्यानंतर व्यवस्थित उपचार झाले नाहीत.
