AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नेतान्याहूंच्या मित्राने दिला इस्रायलला धोका, इराणला पाठिंबा देत केली जहरी टीका

इराण आणि इस्रायल यांच्यात 12 दिवस युद्ध सुरु होते. युद्धाच्या काळात आणि युद्धानंतर वेगवेगळ्या देशांनी दोन्ही देशांना पाठिंबा दिला. मात्र एका देशाने आता इस्रायलला धोका दिला आहे.

नेतान्याहूंच्या मित्राने दिला इस्रायलला धोका,  इराणला पाठिंबा देत केली जहरी टीका
france vs israel
| Updated on: Jun 30, 2025 | 11:12 PM
Share

इराण आणि इस्रायल यांच्यात 12 दिवस युद्ध सुरु होते. यात दोन्ही देशांचे मोठे नुकसान झाले आहे. युद्धाच्या काळात आणि युद्धानंतर वेगवेगळ्या देशांनी दोन्ही देशांना पाठिंबा दिला. अशातच आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांचे मित्र आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी मात्र इस्रायलला धोका दिला आहे. मॅक्रॉन यांनी इराणला पाठिंबा देत इस्रायलवर टीका केली आहे.

इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांना फोन केला होता, याबाबत माहिती देताना मेहर न्यूजने म्हटले की, फ्रान्सने आयएईआय म्हणजेच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीशी सहकार्य संपवण्याच्या इराणच्या निर्णयावर चिंता व्यक्त केली. यावर पेझेश्कियान यांनी म्हटले की, टएजन्सीचे संचालक राफेल ग्रोसी यांनी इराणच्या अणुकार्यक्रमाबद्दल चुकीची माहिती दिली होती. त्यामुळे इस्रायलला आक्रमक होण्याची संधी मिळाली, त्यामुळे इराणने हा निर्णय घेतला.’

मॅक्रॉन यांची इस्रायलवर टीका

मॅक्रॉन पेझेश्कियान यांच्याशी बोलताना म्हणाले की, ‘इस्रायली हल्ल्यांदरम्यान इराणी नागरिकांचा मृत्यू झाला यामुळे फ्रान्स दुःखी आहे. इराणवरील या हल्ल्यांचा निषेध करणारा फ्रान्स हा पहिला देश आहे. मॅक्रॉन यांनी पुढे बोलताना बेंजामिन नेतान्याहू यांचे नाव घेत इराणच्या अणुहल्ल्यात हस्तक्षेप करण्याचा त्यांना कोणताही कायदेशीर आधार आणि अधिकार नाही’ असं विधान केलं.

इस्रायल नियमांविरोधात काम करत आहे

इराणी राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी इस्रायल आणि अमेरिकेवर टीका करतान म्हटले की, ‘इस्रायलच्या तुलनेत इराणच्या अणु कार्यक्रमांवर दुहेरी निकष लावण्यात आले. इराणचा अणुकार्यक्रम IAEA च्या देखरेखीखाली आहे, तरीही अमेरिका आणि इस्रायलने आमच्यावर आरोप करत हल्ला केला. इस्रायल अणुप्रसार कराराचा (NPT) सदस्य नाही, मात्र तरीही हा देश आंतरराष्ट्रीय नियमांविरुद्ध काम करत आहे.’

इराणच्या अणुकार्यक्रमावर पुन्हा हल्ला होऊ शकतो

पेझेश्कियान यांनी म्हटले की, इराणच्या अणुकार्यक्रमावर पु्न्हा हल्ला होणार नाही याची शाश्वती नाही. यामुळे इराणमधील लोक चिंतेत आहेत. हल्ले टाळण्यासाठी सर्वांना कायदे पाळावे लागतील. केवळ आयएईएच नव्हे तर इतर आंतरराष्ट्रीय संघटनांनाही शांतता आणि सुरक्षिततेसाठी पुढाकार घ्यावा लागेल. गचा मार्ग मोकळा करावा लागेल.

ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी...
ठाकरेंच्या सेनेतून विनायक पांडे, यतिन वाघ यांची हकालपट्टी, राऊतांनी....
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ
देवयानी फरांदे यांची भाजप पक्षप्रवेशांवरून नाराजी, FB पोस्टनं खळबळ.
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ
नवनिर्वाचित काँग्रेस नगराध्यक्षानं उधळल्या नोटा, व्हायरल VIDEO नं खळबळ.
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल
उठ दुपारी अन् घे सुपारी... ठाकरे बंधूंच्या युतीवर सदावर्तेंचा हल्लाबोल.
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?
नातलगांना उमेदवारी मिळवण्यासाठी नेत्यांची लगबग, नेत्यांची मागणी काय?.
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर
निवडणुकीपूर्वी NCP मध्ये दुफळी, आघाडीच्या चर्चांवर सुळेंचे मोघम उत्तर.
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक
भाजप-सेनेचे 200 जागांवर एकमत, शिंदेंच्या घरी पहाटेपर्यंत मॅरेथॉन बैठक.
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?
ठाकरे बंधूच्या युती महायुतीशी लढत,मुंबईत कोणाचे किती नगरसेवक जिंकणार?.
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान
डोहाळे जेवणाचा खर्च आमचा.. राणांच्या त्या विधानानंतर अंधारेंचं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा पण जागा वाटप गुलदस्त्यात!.