Iran New Army Chief Killed : मोठी बातमी, इस्रायलचा इराणला मोठा हादरा, पाच दिवसात इराणच्या नव्या आर्मी चीफचा खात्मा
Iran New Army Chief Killed : इस्रायल इराणमध्ये सैन्य नेतृत्वच उभ राहू देत नाहीय. तो त्यांच्या रणनितीचा भाग आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्याच हे युद्ध संपवेल असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलय. खामेनेई आता एकटे पडत चालले आहेत.

इस्रायल-इराण युद्ध आता लवकर थांबण्याची कुठलीही चिन्ह नाहीयत. इस्रायल इराण विरुद्ध निर्णायक विजय मिळवल्यानंतरच थांबेल असं दिसतय. शुक्रवारी युद्धाच्या पहिल्यादिवशी इस्रायलने इराणच्या लष्कर प्रमुखासह अनेक बड्या अधिकाऱ्यांची हत्या केली होती. आता इस्रायलने इराणला आणखी एक धक्का दिला आहे. इस्रायली सैन्याने (IDF) मंगळवारी इराणच्या सशस्त्र पथकांचा नवनियुक्त चीफ ऑफ स्टाफ आणि वरिष्ठ सैन्य कमांडर अली शादमानीला संपवल्याचा दावा केला आहे. पाच दिवसात दुसऱ्यांदा युद्धकाळातील इराणच्या चीफ ऑफ स्टाफचा मृत्यू झाला आहे. इराणसाठी हा मोठा धक्का आहे. शादमानी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे जवळचते सैन्य सल्लागार होते. इस्रायल इराणमध्ये सैन्य नेतृत्वच उभ राहू देत नाहीय. तो त्यांच्या रणनितीचा भाग आहे. अयातुल्ला अली खामेनेई यांची हत्याच हे युद्ध संपवेल असं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलय. खामेनेई आता एकटे पडत चालले आहेत.
IDF ने शादमानी यांच्या मृत्यूबद्दल माहिती देताना सांगितलं की, इस्रायली एअरफोर्सने सोमवार-मंगळवारी रात्री तेहरानच्या सेंट्रल भागात हल्ले केले. त्यात शादमानीचा मृत्यू झाला. IDF च्या गुप्तचर विभागाकूडन मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारावर हा हल्ला करण्यात आला.
इराणी सैन्याच्या रचनेसाठी एक गंभीर झटका
IDF नुसार, शादमानी इराणच्या सशस्त्र सैन्याच्या आपातकालीन कमांड आणि खातम अल-अनबिया मुख्यालयाचे कमांडर होते. इस्लामिक रिवॉल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) आणि इराणी सैन्य दोघांच नेतृत्व करत होते. इस्रायल विरुद्ध इराणच्या युद्ध प्लानला आकार देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. 13 जून रोजी इस्रायली सुरक्षा पथकांनी ऑपरेशन रायजिंग लायन सुरु केलं. त्यामध्ये मेजर जनरल गोलाम अली रशिद यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शादमानी यांची इराणच्या चीफ ऑफ स्टाफपदी नियुक्ती करण्यात आली होती. शादमानी यांचा मृत्यू इराणी सैन्याच्या रचनेसाठी एक गंभीर झटका आहे. इस्रायलने आपल्या रणनितीद्वारे इराणची सैन्य रचनाच हलवून टाकलीय.
