AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

News9 Global Summit Germany Edition : मेगा समिटमध्ये सहभागी होणार हे दिग्गज, जाणून घ्या सर्वकाही

भारत आणि जर्मनीची रणनीतिक भागीदारी कशाप्रकारे काम करतेय यावर सुद्धा न्यूज9 ग्लोबल समिटमध्ये चर्चा होईल. औद्योगिक सहकार्य, जलवायू नेतृत्वापासून शैक्षणिक, कूटनीतिक संबंधांपर्यंत आणि पुढील 25 वर्षाची दिशा देखील ठरवली जाईल.

News9 Global Summit Germany Edition : मेगा समिटमध्ये सहभागी होणार हे दिग्गज, जाणून घ्या सर्वकाही
news 9 global summit
| Updated on: Sep 24, 2025 | 9:29 AM
Share

देशातील प्रमुख न्यूज नेटवर्क, टीवी 9 भारतवर्षच्या न्यूज-9 ग्लोबल समिटच्या दुसऱ्या आवृत्तीच आयोजन 9 ते 10 ऑक्टोंबर पर्यंत जर्मनीच्या स्टटगार्ट शहरात होणार आहे. बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि जर्मनी द्विपक्षीय संबंध मजबूत बनवणं हा आयोजनामागे उद्देश आहे. भारतासारखी उदयोन्मुख शक्ती वाढत्या आत्मविश्वासासह आपलं महत्व लक्षात आणून देत आहे. या समिटचा विषय लोकशाही, लोकसंख्याशास्त्र, विकास, भारत-जर्मनी संबंध आहे. ही समिट दोन्ही देशांच्या संबंधांवर केंद्रीत आहे. मागच्या काही वर्षात दोन्ही देशातील संबंध मजबूत झाले आहेत.

टीवी9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास मागच्यावर्षी म्हणाले होते की, “न्यूज-9 ग्लोबल समिटचा उद्देश भारत आणि जर्मनी दरम्यानचे द्विपक्षीय संबंध दृढ बनवणं आहे. विभिन्न क्षेत्रातील हितधारकांना एकत्र आणून परस्पर विकासासाठी व्यावहारिक समाधान विकसित करणं आहे” जर्मनी युरोपमधील मोठी अर्थव्यवस्था आहे.जर्मनी भारताचा एक प्रमुख भागीदार आहे.भारतीय न्यूज नेटवर्ककडून अशा प्रकारची समिट आयोजित करणं हा पहिला उपक्रम आहे.

हे दोन दिवसीय शिखर सम्मेलन भारत आणि जर्मनीमधील रणनितीक भागीदारीच विश्लेषण करण्यासाठी एक महत्वपूर्ण मंच ठरेल. यात औद्योगिक सहकार्य, जलवायू कारवाई, शैक्षणिक आदान-प्रदान आणि राजनैतिक संबंध या दृष्टीने ही समिट महत्वाची आहे.

आनंदी अय्यर : रिसर्च, इंडस्ट्री आणि पॉलिसी क्षेत्रातील मागच्या दोन दशकातील अनुभव. आनंदी अय्यर भारत-जर्मन सहकार्य वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांनी क्लीन टेक्नोलॉजी मॅन्युफॅक्चरिंग हेल्थ टेक्नोलॉजी आणि स्मार्ट सिटीमध्ये नेतृत्व केलय. शिक्षण, उद्योग आणि सरकार दरम्यान सेतुच काम केलय. या सत्रात आनंदी अय्यर आपले विचार मांडतील. टॉप स्टडी डेस्टिनेशनमध्ये जर्मनीची भूमिका आणि भारताची विशाल प्रतिभा पाइपलाइन, आदान-प्रदान, दुहेरी डिग्री यावर बोलतील.

राजिंदर एस भाटिया : सोसायटी ऑफ इंडियन डिफेंस मॅन्युफॅक्चरर्सचे (एसआईडीएम) अध्यक्ष आणि कल्याणी स्ट्रॅटेजिक सिस्टिम्स लिमिटेडचे अध्यक्ष, राजिंदर एस. भाटिया, न्यूज़9 ग्लोबल समिट 2025 मध्ये ‘सुरक्षा आणि स्थिरता आणि मापनीयता (स्केलेबिलिटी) संरक्षण क्षेत्रातील बदल’ यावर बोलतील.

राजिंदर एस. भाटिया यांनी कल्याणी/भारत फोर्ज समूहाच्या माध्यमातून जागतिक भागीदाऱ्या बनवताना आत्मनिर्भर भारताचा अभियान पुढे नेलं. एसआयडीएमचे अध्यक्ष म्हणून संरक्षण आणि एअरोस्पेससाठी रणनीतिक नीति कार्यबलात एक प्रमुख व्यक्ति आहेत.

डॉ. विवेक लाल : जनरल एटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे सीईओ डॉ. विवेक लाल, न्यूज़9 ग्लोबल समिटमध्ये सहभागी होतील. एअरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात आघाडीचे लीडर म्हणून ते जागितक स्तरावर ओळखले जातात. विवेक यांनी अत्याधुनिक टेक्नोलॉजी पुढे नेण्यासाठी अमेरिका, भारत आणि यूरोपमध्ये रणनीतिक भागीदाऱ्यांना आकार देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यांची विशेषज्ञता डिफेंस इनोवेशन, इंडस्ट्रियल ऑपरेशन आणि पुढच्या पिढीच्या मॅन्युफॅक्चरिंग विस्तारापर्यंत पसरलेली आहे.

युरोपचा संरक्षण खर्च वाढत आहे. जर्मनीची औद्योगिक शक्ती आणि भारताचा वेगाने विकसित होणारा डिफेंस मॅन्युफॅक्चरिंग बेस कसे एकत्र येऊ शकतात यावर सुद्धा या सत्रात चर्चा होईल. को-प्रोडक्शन आणि टेक्नोलॉजी ट्रांसफरपासून एडवांस मॅन्युफॅक्चरिंग आणि सतत विकास भारत-जर्मनी कॉरिडोर, भविष्यात डिफेंस इकोसिस्टमला कशी ताकद देईल.

जागतिक व्यवस्था महत्वपूर्ण परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे. स्टटगार्टमध्ये न्यूज9 ग्लोबल समिटमध्ये भारत आणि जर्मनीसाठी डेमोक्रेसी, डेमोग्राफी आणि डेवलपमेंटशी संबंधित आव्हनं आणि संधी यावर चर्चा होईल.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.