AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या संख्येने भारतीयांनी UAE ला आपलं घर बनवलं, न्यूज9 ग्लोबल समीटमध्ये बोलले भारतीय राजदूत संजय सुधीर

"अबू धाबीमधील बीएपीएस हिंदू मंदिर हे या देशातील पहिलं मंदिर आहे. बुर्ज खलीफाप्रमाणे आज या मंदिराचा त्या देशातील प्रतिष्ठीत स्थानांमध्ये समावेश होतो. यूएईमध्ये क्रिकेट सुद्धा लोकप्रिय आहे" असं UAE मधील भारतीय राजदूत संजय सुधीर म्हणाले.

मोठ्या संख्येने भारतीयांनी UAE ला आपलं घर बनवलं, न्यूज9 ग्लोबल समीटमध्ये बोलले भारतीय राजदूत संजय सुधीर
uae indian ambassador sunjay sudhir
| Updated on: Jun 19, 2025 | 1:58 PM
Share

टीव्ही 9 नेटवर्कच न्यूज 9 ग्लोबल समिट दुबईत सुरु झालं आहे. या शानदार कार्यक्रमात UAE मधील भारतीय राजदूत संजय सुधीर सहभागी झाले होते. “भारत आणि यूएईचे संबंध खूप खास आहेत. तो आमचा जवळचा भागीदार आहे. मोठ्या संख्येने भारतीय लोक यूएईला आपल घर बनवत आहेत. अबूधाबीमधील बीएपीएस हिंदू मंदिर यूएईमधील सद्भावनेच शानदार उदहारण आहे. मोठ्या संख्यने लोक इथे फिरायला येतात” असं भारतीय राजदूत संजय सुधीर म्हणाले. “भारत आणि जगाच्या अन्य भागातून इथे आलेल्या लोकांच मी स्वागत करतो. मला इथे उपस्थित राहताना खूप आनंद होतोय. न्यूज 9 भारताच्या डायनॅमिक मीडियाचा फेस आहे, असं मी मानतो. देशातील राजकीय, आर्थिक, सामाजिक विषयांवर आपली एक खास छाप उमटवतो” असं संजय सुधीर म्हणाले. जर्मनीतील ग्लोबल समिटच्या यशस्वी आयोजनानंतर नटवर्ककडून यंदा दुबईमध्ये समीट आयोजित करण्यात आलं आहे.

भारत आणि यूएईच्या दूरदृष्टीबद्दल बोलताना संजय सुधीर म्हणाले की, “आजच्या तारखेला भारत आणि यूएईमध्ये खूप खास संबंध आहेत. जगात आजच्या घडीला यूएई भारताचा जवळचा व्यापारी भागीदार आहे. या क्षेत्रातील यूएई पहिला देश आहे, ज्यांच्यासोबत कॉम्परेहेंसिव स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप एग्रीमेंट 2017 साली करण्यात आलं. भारत आणि यूएईमध्ये ऐतिहासिक संबंध आहेत. अजून ही मैत्री दृढ होत चालली आहे”

हा आमचा पहिला CEPA करार

“आमची मैत्री दृढ होत चालली आहे. यूएईने आमच्यासोबत CEPA म्हणजे कॉम्परेहेंसिव इकोनॉमिक पार्टनरशिप एग्रीमेंट (India-UAE Comprehensive Economic Partnership Agreement 2022) करार केलाय. कुठल्याही देशासोबत हा आमचा पहिला CEPA करार आहे. यूएईने आमच्यासोबत CEPA करार करुन खूप साहसी पाऊल उचललं” असं संजय सुधीर म्हणाले.

द्विपक्षीय व्यापारात खूप प्रगती

“यूएई असा एकमेव देश आहे, ज्यांनी आमच्या रणनितीक पेट्रोलियम भंडारमध्ये (Strategic Petroleum Reserves) गुंतवणूक केली आहे. मागच्या आर्थिक वर्षात 2024-25 मध्ये आमच्या द्विपक्षीय व्यापारात खूप प्रगती झाली. मॅजिकल लेव्हल 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला. यंदा 19 टक्के वाढ झालीय” असं संजय सुधीर यांनी सांगितलं.

यूएईमध्ये भारतीय राजदूत संजय सुधीरसोबत टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास

यूएईसोबत मैत्रीसंबंध भक्कम

यूएईसोबत मैत्रीसंबंध भक्कम होत आहेत, हे सांगताना ते म्हणाले की, “एकाबाजूला आज आमच्या नेत्यांमध्ये मजबूत संबंध आहेत. पुढच्या पिढीसोबतही चांगले संबंध निर्माण होत आहेत” दुबईत IIFT कॅम्पस असल्याच त्यांनी सांगितलं.

पहलगाम हल्ल्याचा निषेध करणारा यूएई पहिला देश

“अबू धाबीमधील बीएपीएस हिंदू मंदिर हे या देशातील पहिलं मंदिर आहे. हे मंदिर भारत आणि यूएईमधील द्विपक्षीय संबंधाच प्रतिनिधीत्व करतं. सद्भावनेच हे शानदार उदहारण आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या मंदिराच उद्घाटन केलं होतं. बुर्ज खलीफाप्रमाणे आज या मंदिराचा त्या देशातील प्रतिष्ठीत स्थानांमध्ये समावेश होतो. यूएईमध्ये क्रिकेट सुद्धा लोकप्रिय आहे. भारतीय क्रिकेटबद्दल यूएईमध्ये प्रचंड उत्सुक्ता असते” असं संजय सुधीर म्हणाले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचाला उल्लेख करताना ते म्हणाले की, “ही घटना जेव्हा झाली, तेव्हा यूएई निषेध करणारा पहिला देश होता”

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.