जेव्हा महिला पुढे जातात, तेव्हा त्यांच्यासोबत मानवताही पुढे जाते, TV9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरुण दास यांचे प्रतिपादन!
न्यूज-9 ग्लोबल परिषदेच्या दुसऱ्या पर्वाची यूएईमध्ये बुधवारी (27 ऑगस्ट) मोठ्या थाटात सुरुवात झाली. यावेळी बॉलिवुड जगतातील अनेक प्रसिद्ध चेहरे उपस्थित होते. तसेच उद्योग जगतातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही यावेळी या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी तसेच सीईओ बरुण दास यांनी SHEconomy अजेंड्यावर उद्घाटनपर भाषण केले.

News9 Global Summit: न्यूज-9 ग्लोबल परिषदेच्या दुसऱ्या पर्वाची यूएईमध्ये बुधवारी (27 ऑगस्ट) मोठ्या थाटात सुरुवात झाली. यावेळी बॉलिवुड जगतातील अनेक प्रसिद्ध चेहरे उपस्थित होते. तसेच उद्योग जगतातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनीही यावेळी या कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात टीव्ही 9 नेटवर्कचे एमडी तसेच सीईओ बरुण दास यांनी SHEconomy अजेंड्यावर उद्घाटनपर भाषण केले. यावेळी त्यांनी सक्षमीकरण तसेच सर्वसमावेशकता या भावनांना केंद्रस्थानी ठेवून प्रेरणादायी भाषण केले. आज आपल्या भोवतीचा समाज हा बौद्धिक श्रेष्ठतेने प्रेरित आहे. आतापर्यंत महिलांनी मोठे यश संपादन केलेले आहे. महिला आज वेगवेगळ्या क्षेत्रात यस संपादन करताना दिसत असल्या तरी अजून बरीच प्रगती करणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
महिलांनी अनेक व्यवसायांत नेतृत्व करून दाखवलेलं आहे
आजघडीला महिलांनी अनेक अडचणींना पार केलेलं आहे. मात्र अजूनही बरंच काम होणं गरजेचं आहे. समानता हा सक्षमीकरणाचा मूळ गाभा आहे. समानता म्हणजे कोणावर उपकार करणे नव्हे. आज समानता न्यायपूर्ण, प्रगतीशील आणि गतिमान जगासाठी एक गरज आहे, असे मत यावेळी बरुण दास यांनी व्यक्त केले. तसेच लग्नाच्या बाबतीत आपण महिलांना नेहमीच अर्धांगिनी असे म्हणतो. मात्र आपल्या आजूबाजूला समाजाच्या प्रत्येक ठिकाणी महिला खरंच अर्धांगिनी आहे का? असा सवाल करत त्यांनी महिलांनी अनेक व्यवसायांत नेतृत्व करून दाखवलेलं आहे. अशांतीच्या काळातही महिलांनी आपले कौशल्य, निश्चयी बाणा सिद्ध करून दाखवलेला आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
“Why is it that we still have mostly men in leadership positions” TV9 Network’s MD & CEO @justbarundas #SHEconomyAgenda #News9GlobalSummit pic.twitter.com/rQ5smJ5lGr
— News9 (@News9Tweets) August 27, 2025
इंदिरा नुयी यांचा सांगितला किस्सा
महिला जेव्हा प्रगती करतात तेव्हा संपूर्ण समाज त्यांच्यासोबत प्रगती करत असतो. महिला पुरुषांमुळे अर्धांगिनी नाहीत. महिला जेव्हा पुढे जातात तेव्हा त्यांच्यासोबत मानवताही पुढे जाते, असेही मत बरुण दास यांनी व्यक्त केले. तसेच पेप्सिको कंपनीच्या माजी अध्यक्षा इंदिरा नुयी यांना बढती मिळाल्यानंतर त्यांच्या आईची प्रतिक्रिया कशी होती, याचेही एक उदाहरण त्यांनी सांगितले आहे. इंदिरा नुयी यांना त्यांच्या कंपनीत बढती मिळाली होती. त्यांना पेप्सिको कंपनीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. या निर्णयामुळे त्या खूप आनंदी झाल्या होत्या. त्यांनी हीच बातमी घरी जाऊन आपल्या आईला सांगितली. आईने मात्र आज दुधवाला आला नाही. त्यामुळे तू घरी येताना दूध घेऊ यायला हवं होतंस, असे म्हणाल्या होत्या. आईचे उत्तर ऐकून आई मी आताच तर अध्यक्ष झाली आहे, ही वेळ आनंद साजरा करण्याची आहे, असे उत्तर इंदिरा यांनी दिले होते. इंदिरा यांचे हे विधान ऐकून त्यांच्या आईने जेव्हा तू घरी येतेस तेव्हा तुझा पदाचा हा मुकूट गॅरेजमध्येच ठेऊन येत जा. जेव्हा तू घरी येतेस तेव्हा तू एक आई, पत्नी आणि कोणाचीतरी मुलगी आहेस असे इंदिरा यांच्या आई म्हणाल्या होत्या, असेही बरुण दास सांगितले.
