Nobel Prize: कादंबरीकार अब्दुलरझाक गुरनाह यांना जाहीर, रॉयल स्वीडीश अ‌कॅडमीकडून घोषणा

रॉयल स्वीडीश अ‌कॅडमीनं 2021 साठीचा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार कांदबरीकार अब्दुलरझाक गुरनाह (Abdulrazak Gurnah) यांना जाहीर केला आहे. स्वीडीश अकॅडमीनं पुरस्कार जाहीर केला आहे.

Nobel Prize: कादंबरीकार अब्दुलरझाक गुरनाह यांना जाहीर, रॉयल स्वीडीश अ‌कॅडमीकडून घोषणा
Abdulrazak Gurnah
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Oct 07, 2021 | 5:08 PM

स्टॉकहोम: रॉयल स्वीडीश अ‌कॅडमीनं 2021 साठीचा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार कांदबरीकार अब्दुलरझाक गुरनाह (Abdulrazak Gurnah) यांना जाहीर केला आहे. स्वीडीश अकॅडमीनं पुरस्कार जाहीर करताना अब्दुलरझाक गुरनाह यांनी त्यांच्या लेखनीतून संस्कृती, शरणार्थीचं भविष्य यासंदर्भात लिखाण केलं आहे, असं म्हटलंय. अब्दुलरझाक गुरनाह यांनी त्यांच्या कादबंऱ्याद्वारे सत्यस्थिती मांडण्याचा प्रयत्न केलाय. पूर्व आफ्रिकेतील स्थिती, आखाती देशातील स्थिती मांडण्याचा प्रयत्न गुरनाह यांनी केलाय.

अब्दुलरझाक गुरनाह यांच्या आतापर्यंत 10 कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. याशिवाय त्यांनी लघू कथांचं लेखन देखील केलं आहे. अब्दुलरझाक गुरनाह यांचा जन्म 1948 मध्ये झंझीबार बेटावर झाला. नंतर ते इंग्लंडला शरणार्थी म्हणून गेले. गेल्या काही दिवसांपूर्वी ते इंग्लंडमधील केंटरबरी येथील केंट विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून काम करत होते.

2020 मध्ये साहित्य क्षेत्रातील नोबेल अमेरिकी कवियत्री लुईस ग्लूक यांना जाहीर झाला होता. त्या अमेरिकेतील येल विद्यापीठात इंग्रजीच्या प्राध्यापक होत्या.

भौतिकशास्त्रातील नोबेल जाहीर

रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने (Royal Swedish Academy of Sciences) 2021 वर्षाचे भौतिकशास्त्रासाठीचे (Physics) नोबेल पारितोषिक जाहीर केले आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने 2021 चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक स्युकुरो मनाबे (Syukuro Manabe), क्लाऊस हॅसलमन (Klaus Hassselmann) आणि जियोर्जियो पारिसी (Giorgio Parisi) यांना जाहीर झााला आहे. या तिघांना हा पुरस्कार त्यांच्या जटिल भौतिकशास्त्र प्रणालींच्या संशोधन कार्यासाठी देण्यात आला आहे.

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा

2021 च्या वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची (Nobel Prize 2021) घोषणा झाली आहे. 2021 चा वैद्यकिय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार डेव्हिड ज्युलिअस (David Julius) आणि अर्डेम पटापौटियन (Ardem Patapoutian) यांना मिळाला आहे. या दोघांनीही तापमान आणि स्पर्श संवेदना जाणवण्यासाठी रिसेप्टर्सवर संशोधन केलं आहे.

इतर बातम्या:

Nobel Prize 2021: भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा, स्युकुरो मनाबे, क्लाऊस हॅसलमन, जियोर्जियो पारिसींचा सन्मान

Nobel Prize 2021: वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा, त्वचेवर संशोधन करणाऱ्या डेव्हिड ज्युलिअस, अर्डेम पटापौटियन यांना नोबेल पुरस्कार

Nobel Prize in Literature is awarded to the novelist Abdulrazak Gurnah

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें