आता आणखी दोन बलाढ्य देश आमने-सामने, युद्ध अटळ? बहीण भावानं जगाचं टेन्शन वाढवलं
इराण आणि इस्रायलमध्ये भीषण युद्ध झालं, या युद्धानंतर आता आणखी दोन बलाढ्य देशांमध्ये युद्ध पेटण्याची शक्यता आहे.

उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांनी आता थेट अमेरिकेविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. किम जोंग उन यांनी मागील 24 तासांमध्ये दोन मोठे निर्णय घेतले आहेत, किम जोंग उन यांच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेचं टेन्शन वाढलं आहे. डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत, मात्र त्यांच्या कार्यकाळातील ही पहिलीच अशी वेळ आहे, किम जोंग उन यांनी थेट अमेरिकेच्या विरोधात भूमिका घेतली आहे.
उत्तर कोरियाचे हुकूमशाहा किम जोंग उन यांना अमेरिकेचा कट्टर विरोधक मानलं जातं. अण्वस्त्रधारी उत्तर कोरियाकडे क्षेपणास्त्रांचा देखील मोठा साठा आहे, ज्या द्वारे किम जोग उन हे कधीही अमेरिकेवर हल्ला करू शकतात असं बोललं जातं. त्यामुळे आता अमेरिकेच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.
24 तासांमध्ये दोन मोठे निर्णय
उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांनी रविवारी विजयी दिवसानिमित्त मोठी घोषणा केली आहे, ते म्हणाले की आम्ही यापूर्वीही अमेरिकेच्या सैन्याचा पराभव केला आहे, आणि आता पुन्हा वेळ आली तर आम्ही तयार आहोत. आम्ही अमेरिकेशी निकरानं लढू असं उन यांनी म्हटलं आहे. उत्तर कोरियामध्ये सैन्य हालचाली वाढल्या आहेत. आम्ही अमेरिकेविरोधात लढण्यासाठी कधीपण तयार आहोत, अमेरिकेसारख्या साम्राज्यवादी देशाकडून आम्ही कधीही पराभूत होणार नाही, असं उन यांनी विजयी दिवसानिमित्त केलेल्या भाषणात म्हटलं आहे.
तर दुसरीकडे किम जोंग उन यांची बहीण यो जोंग यांनी दक्षिण कोरियानं पाठवलेला चर्चेचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे, दक्षिण कोरियासोबत चर्चा करण्यात आम्हाला कोणतंही स्वारस्य नाही, असं यो जोंग यांनी म्हटलं आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यांनी उत्तर कोरियाकडे चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता, दरम्यान उत्तर कोरियाच्या या निर्णयामुळे आता अमेरिकेचं टेन्शन आणखी वाढलं आहे. उत्तर कोरियानं आता उघडपणे अमेरिकेला आव्हान दिलं आहे. मात्र यावर अद्याप तरी अमेरिकेची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.
