आम्ही भारताच्या धमक्यांना भिक घालत नाही, कारण… पाक नागरिकांची दर्पोक्ती, हे मोठे कारण आले समोर…
भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने देशात आणीबाणी जाहीर केली आहे. पाकिस्तानने सुरक्षेचा उपाय म्हणून या महिन्यात कराची आणि लाहोर हवाई क्षेत्राचे काही हिस्से रोजचे चार तास बंद केले आहेत. सोशल मीडियावर मात्र पाकिस्तानी अभिमानाने त्यांच्या एका व्यक्तीच्या कबरीचा फोटो व्हायरल करीत आहेत...कोण ते...?

अतिशय घातक गुप्तहेर संघटना असलेल्या आयएसआयच्या मदतीने पाकिस्तानी लष्करानेच काश्मीरच्या पहलगाम येथील बैरसण व्हॅलीत हमास सदृश्य हल्ला घडवून क्रुरपणे पर्यटकांना मारल्याचे उघड झाले आहे. या हल्ल्यात एका स्थानिकासह २६ पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. त्यात हनीमूनवर गेलेल्या नौदलाचे अधिकारी विनय नरवाल यांचा बळी गेला. त्याच्या पत्नी हिमांशी यांचा त्यांच्या निस्तेज देहाशेजारी बसलेला फोटो काळीज पिळवटून टाकणारा आहे. त्याने या खंडप्राय देशात अक्षरश: शोक लहर पसरली..आता भारताने स्ट्रेटॅजिक पावले उचलत पाकिस्तानचे नाक बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असला तरी पाकिस्तान फुशारक्या मारीत आहे…सोशल मीडियावर पाकच्या निशान-ए-इम्तियाज असलेल्या या एका व्यक्तीच्या कबरीचा फोटो झळकत आहे….
भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने देशात आणीबाणी जाहीर केली आहे. पाकिस्तानने सुरक्षेचा उपाय म्हणून या महिन्यात कराची आणि लाहोर हवाई क्षेत्राचे काही हिस्से रोजचे चार तास बंद केले आहेत. देशातील सर्व विमानतळांना हायअलर्ट मोडवर ठेवले आहे. पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताची काही ना काही जबाबी कारवाई होईलच याची धाकधाकू पाकिस्तानला लागली आहे. तरीही पाकिस्तानचे नेते आमच्याकडे अणूबॉम्ब आहे अशा फुशारक्या मारीत असल्याचे चित्र आहे.
पाकिस्तानच्या या सुपूत्राच्या कबरीचा सध्या सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहे. ते दुसरे तिसरे कोणी नसून पाकच्या अणुप्रकल्पातील एक अग्रणी, निशान-ए-इम्तियाजसह अनेक पुरस्कार विजेते डॉ.अब्दुल कादीर खान ( Dr Abdul Qadeer khan ) हे होत. पाकिस्तानच्या अणुक्षमतेतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना सर्वत्र ओळखले जाते. पाकिस्तानच्या राष्ट्रीय अभिमानाचे आणि तांत्रिक प्रगतीचे ते प्रतीक होते.त्यांच्यामुळे पाकिस्तान पहिले इस्लामिक आण्विक क्षमता असलेले इस्लामिक राष्ट्र ठरले आणि देश संरक्षणात स्वयंपूर्ण झाला असे पाकच्या अस्मितेचे डॉ.अब्दुल कादीर खान प्रतिक ठरले आहेत.
भारत आणि पाकिस्तान एक तुलना –

पाकिस्तानचे नागरिक आता सोशल मीडियावर मिम्स बनवत असून आपण डॉ.अब्दुल कादीर खान यांच्यामुळेच सुरक्षित आहोत हे कबूल करीत त्यांचे आभार मानत आहेत. त्यासंदर्भात सोशल मीडियावर मिम्सचा पुर आला आहे.
येथे पाहा पोस्ट –
View this post on Instagram
डॉ. अब्दुल कादीर खान यांचा जन्म १ एप्रिल १९३६ रोजी मध्य प्रदेशातील भोपाळ मध्ये झाला होता. ते विज्ञान क्षेत्रातील पाकिस्तानच्या सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक बनले. त्यांना पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाचे जनक म्हटले जाते.१९४७ मध्ये फाळणीच्या वेदनांनी त्यांचे बालपण होरपळले.त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला कराचीला स्थलांतर करावे लागले. खान यांनी कराची शहरात माध्यमिक आणि उच्च शिक्षण घेतले आणि त्यांना सुरुवातीच्या काळापासूनच विज्ञान आणि अभियांत्रिकीत रस होता. त्यानंतर, १९६० च्या दशकाच्या सुरुवातीला युरोपला जाण्यापूर्वी त्यांनी कराची विद्यापीठात धातुकर्म अभियांत्रिकीचे पुढील शिक्षण घेतले.
डॉ. अब्दुल कादीर खान यांचा फोटो

त्यांनी नेदरलँड्समधील डेल्फ्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधून धातुकर्म अभियांत्रिकीत बीएस पदवी घेतली आणि नंतर, १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला, त्यांनी पीएच.डी.मिळविली. नेदरलँड्समधील युरेनियम समृद्धीकरण सुविधेतील त्यांचे काम हे पाकिस्तानच्या अणु महत्त्वाकांक्षेसाठी निर्णायक ठरले. १९७० च्या दशकात पाकिस्तानात परतल्यानंतर, खान यांना भारताने केलेल्या १९७४ च्या अणुचाचणीची चिंता लागली होती. त्यामुळे पाकिस्तानलाही अण्वस्र सज्ज करण्याचा त्यांचा निर्धार आणखी वाढला. १९७६ मध्ये ते कहुता संशोधन प्रयोगशाळेत ( Kahuta Research Laboratories – KRL) त्यांनी अणुकार्यक्रम सुरु केला.
कारकीर्द डागाळली….
परंतु डॉ. अब्दुल कादीर खान यांच्या कारकीर्दीला डागही लागला. साल २००४ मध्ये त्यांच्यावर इराण आणि उत्तर कोरियासारख्या देशांना संवेदनशील अणु तंत्रज्ञान आणि साहित्य पुरवल्याचा आरोप करण्यात आला. ज्यामुळे त्यांना मानहानी पत्करावी लागली. त्यांचा साल २०२१ च्या ऑक्टोबरमध्ये मृत्यू झाला.
