‘इस बार घर में घुसके..नको, तर घरात शिरुन…,’ काय म्हणाले असुद्दिन ओवैसी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाचे वातावरण आहे. पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याला संपूर्ण स्वातंत्र्य दिले आहे आणि सैन्याला त्यांच्या इच्छेनुसार लक्ष्य निर्धारित करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यात आत एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी एक वेगळी मागणी केली आहे.

जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर देशात संताप व्यक्त होत आहे. आणि पहलगाममध्ये २६ निष्पाप पर्यटकांचे जीव घेणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांना हुडूकन ठार करण्याची मागणी होत असताना आता विरोधी पक्षांनी देखील एकजूट दाखवत पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवा असे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्याला पाकिस्तानी अतिरेक्यांवर कारवाई करण्याची मोकळी सूट दिली आहे. त्यात आता एमआयएमचे असुद्दीन ओवेसी यांनी यांनी देखील एक मागणी केली आहे.
येथे पाहा पोस्ट –
#WATCH | Hyderabad, Telangana: AIMIM chief and MP Asaduddin Owaisi says, “…BJP says ‘ghar me ghus ke maarenge’. If you (central government) are taking action this time (against Pakistan), ‘toh ghar mein ghus kar baith jana’. It is the resolution of the Indian Parliament that… pic.twitter.com/lFFareuYgY
— ANI (@ANI) May 1, 2025
एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी यासंदर्भात केंद्र सरकारला पाठिंबा देत कठोर कारवाईची मागणी केली आहे. ते म्हणाले की जर पाकिस्तानवर कारवाई होत असेल तर केवळ घरात घुसून मारुन उपयोग नाही तर घरात घुसून बसले पाहिजे. असुद्दीन ओवैसी पुढे म्हणाले की पाक व्याप्त काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचा ठराव संसदेने मंजूर केलेला असून दहशतवाद संपविण्याची शपथ घेण्यात आली आहे. तर याच दृष्टीने पाकिस्तानवर कारवाई व्हायला हवी.
घरात घुसून ठाण मांडून बसायला हवे
ओवैसी म्हणाले की भाजपा म्हणतेय की घरात घुसून मारणार, जर यावेळी कारवाई करण्याची त्यांची तयारी आहे तर घरात घुसून ठाण मांडून बसायला हवे असे असुद्दीन ओवैसी यांनी सांगितले. हैदराबादचे खासदार AIMIM चे प्रमुख असुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारचे समर्थन केले आहे. परंतू भाजपावर टीकाही केली आहे. जर गुलाम काश्मीर आपला हिस्सा आहे तर आणि सरकार जर हे मान्य करीत असेल तर मग ही कारवाई जमीनीस्तरावर देखील झालेली दिसायला हवी आहे असेही ओवैसी यांनी म्हटले आहे.
