AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काश्मिरमधील नागरिकांसमोर आम्ही अपयशी ठरलो; OIC परिषदेत इम्रान खान यांनी गायिले काश्मिरचे गोडवे

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (Organisation of Islamic Cooperation) बैठकीत काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे.

काश्मिरमधील नागरिकांसमोर आम्ही अपयशी ठरलो; OIC परिषदेत इम्रान खान यांनी गायिले काश्मिरचे गोडवे
Imran KhanImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 22, 2022 | 9:45 PM
Share

इस्लामाबादः पाकिस्तानची (Pakistan) राजधानी इस्लामाबादमध्ये ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनच्या (Organization of Islamic Cooperation) बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांनी पुन्हा एकदा काश्मीरचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी या बैठकीत पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आहे. तर या काळात चीनमध्ये ज्या मुस्लिमांवर अन्याय अत्याचार सुरु आहेत, त्याच्याबद्दल मात्र त्यांनी एक अवाक्षरही काढले नाही. इम्रान खान यांच्या शब्दात शब्दा मिसळून सौदी अरेबियानेही या बैठकीत काश्मीरबाबत वक्तव्य केले आहे.

यावेळी सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी सांगितले की, आमचा देश काश्मीरमधील नागरिकांसोबत असून काश्मीरचा मुद्दा सोडवण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरही आमचा पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन ही 57 सदस्य असलेल्या मुस्लीम देशांची संस्था आहे. या संघटनेच्या परराष्ट्र मंत्री परिषदेच्या 48 व्या सत्राच्या उद्घाटनप्रसंगी इम्रान खान यांनी मनोगत व्यक्त केले. या परिषदेत त्यांनी सांगितले की, ‘आम्ही पॅलेस्टिनी आणि काश्मिरमधील नागरिकांसमोर आम्ही अपयशी ठरलो आहोत. या नागरिकांवर आम्ही कोणत्याही प्रकारचा प्रभाव पाडू शकलो नाही.

खुर्ची टिकवण्यासाठी प्रयत्न

राजकीय उलथापालथीच्या घटना घडणार असल्याने पाकिस्तानमध्ये सध्या इम्रान खान आपली खुर्ची टिकवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसत आहेत. तसेच राजकीय बदल घडू नयेत यासाठी ते काश्मीरच्या मुद्यावर त्यांनी मुस्लिम देशांना एकत्र येण्याचे आवाहन करत असल्याचे दिसत आहे.

चीनमधील मुस्लिमांवर अत्याचार सुरूच

इस्लामाबादमध्ये ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनच्या बैठकीत चीनचे राज्य समुपदेश आणि परराष्ट्र मंत्री वांग यी हे पाकिस्तानच्या निमंत्रणावरुन ते विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिले आहेत. चीनमधील उइघुर आणि इतर तुर्किक अल्पसंख्याकांवर अन्याय अत्याचार केले जात आहेत, हे प्रकार सुरु असतानाही आणि उइघुर या मुस्लीमांना छावणीत ठेवले गेले तरीही इम्रान खान यांच्याकडून चीनला पाठिंबा देण्यात येत आहे.

आम्हाला कोणताही देश जिंकायचा नाही

या बैठकीत इम्रान खान सांगितले की, कोट्यवधी लोक असतानाही आम्ही पॅलेस्टाईन आणि काश्मीरमधील नागरिकांवर कोणताही प्रभाव पाडू शकलो नाही. त्यामुळे आपल्यामध्ये एकजूट असणे गरजेची आहे, नाही तर हे अत्याचार सतत सुरुच राहणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आम्हाला कोणताही देश जिंकायचा नाही, मात्र आम्ही फक्त काश्मीरमधील आणि पॅलेस्टाईनच्या नागरिकांच्या न्याय्य हक्कांबद्दल बोलत आहोत.

संबंधित बातम्या

हिंगोलीमध्ये बिस्कीट देण्याच्या बहाण्यानं चिमुरडीसोबत लज्जास्पद कृत्य! गुन्हा दाखल, पण आरोपी मोकाटच

School : आता दप्तराचं ओझं होणार कमी, आता सर्व धडे एकाच पुस्तकात, पहिलीपासून द्विभाषिक पाठ्यपुस्तके, काय आहे शिक्षण विभागाचा नवा निर्णय?

पाकिस्तानने थकवले एक लाख कोटींचे कर्ज; दिल्ली हायकोर्ट म्हणते कर्जवसुलीची जबाबदारी केंद्राची

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.