Hingoli | बिस्कीट देण्याच्या बहाण्यानं चिमुरडीसोबत लज्जास्पद कृत्य! गुन्हा दाखल, पण आरोपी मोकाटच

Hingoli minor girl molest : घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी हिंगोली ग्रामीण पोलिसांत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी संशयित आरोपी कनिष्क कांबेळविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Hingoli | बिस्कीट देण्याच्या बहाण्यानं चिमुरडीसोबत लज्जास्पद कृत्य! गुन्हा दाखल, पण आरोपी मोकाटच
अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पण आरोपी मोकाटच!
Image Credit source: TV9 Marathi
रमेश चेंडके

| Edited By: सिद्धेश सावंत

Mar 22, 2022 | 9:46 PM

हिंगोली : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आठ वर्षांच्या अल्पवयीन चिमुरडीवर बिस्किट देण्याच्या बहाण्यानं राक्षसी कृत्य केलंय. या चिमुरडीचा विनयभंग (minor girl molested) करण्याऱ्याविरोधात पोलिसांत तक्रारही देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Hingoli police) गुन्हा दाखल केला असून अद्याप अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जातो आहे. आठ वर्षांची चिमुरडी शौचालयासाठी घराबाबहेर पडली होती. त्यावेळी नराधमानं तिला बिस्किट देण्याचं आमीष दाखवलं. यानंतर या चिमुरडीला पकडून तिची पॅन्ट नराधमानं खाली करुन या मुलीचा विनयभंग केलाय. बराच वेळ घराबाहेर शौचासाठी केलेली मुलगी घरी का परतली नाही, म्हणून तिची आई मुलीला पाहण्यासाठी बाहेर आली. तेव्हा आईला या चिमुरडीच्या रडण्याचा आवाज आला. तेव्हा नराधमानं तिथून पळ काढला. दरम्यान, नंतर हा सगळा प्रकार पोलिसांना कळवण्यात आला आणि याप्रकरणी गुन्हाही दाखल करण्यात आला.

कोण आहे तो नराधम?

कनिष्क केदारलिंग कांबळे या नराधमानं चिमुरडीला बिस्किटाचं आमीष दाखवलं होतं. यानंतर तिला पकडून तिची पॅन्ट खाली करुन विनयभंग करण्यात आला. ही चिमुकली बराच वेळ घरी न परतल्यानं तिची आईची चिंतीत झाली. शोचालयासाठी ही मुलगी घराच्या बाहेर पडली होती.

दरम्यान, पीडित मुलीची आई बाहेर आल्यानंतर संशयित आरोपी कनिष्कनं घटनास्थळावरुन पळ काढला. यानंतर या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी हिंगोली ग्रामीण पोलिसांत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी संशयित आरोपी कनिष्क कांबेळविरुद्ध पॉक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

अटक का नाही?

गुन्हा दाखल करण्यात आला असूनही या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. संशयित आरोपीला संध्याकाळी 7.30 वाजेपर्यंत अटक करण्यात न आल्यानं संताप व्यक्त केला जातोय. हिंगोली ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सध्या या विनयभंगप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

प्रधानपदाची निवडणूक लढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांपासून बिल्डरांची घरे लुटणाऱ्याला अटक

नाशिकमध्ये प्रेम संबंधांतून तरुणावर धारदार शस्त्रानं सपासप वार! हल्ल्यात तरुण गंभीर जखमी, तिघांना अटक

Buldhana Suicide : बुलढाण्यात विहिरीत उडी घेऊन प्रेमीयुगुलाची आत्महत्या, गोशिंग शिवारातील घटना


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें