AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor Inside Stroy : पाकिस्तानची लंका जाळणारा मोदींचा हनुमान कोण? सीक्रेट गेम कसा ठरला? ऑपरेशन सिंदूर नाव दिलं कुणी?

India strikes Pakistan : 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. यामध्ये 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले. या ऑपरेशनची कमान कोणाकडे सोपवण्यात आली होती ? ऑपरेशन सिंदूर नाव कोणी दिलं ? वाचा इनसाइड स्टोरी..

Operation Sindoor Inside Stroy : पाकिस्तानची लंका जाळणारा मोदींचा हनुमान कोण? सीक्रेट गेम कसा ठरला? ऑपरेशन सिंदूर नाव दिलं कुणी?
ऑपरेशन सिंदूर नाव दिलं कुणी? Image Credit source: social media
| Updated on: May 07, 2025 | 11:51 AM
Share

Operation Sindoor Name : काल मध्यरात्री जेव्हा कोट्यावधी भारतीय झोपेत होते, तेव्हा पाकिस्तानची झोप मात्र उडाली होती. त्याचं कारणंही तसंच खास होतं, ते म्हणजे मध्यरात्रीच भारताने पाकिस्तानवर अटॅक केला. रात्री 1 च्या सुमारास भारताने क्षेपणास्त्रांचा वर्षाव करत अनेक दहशतवाद्यांचे जीव घेतले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणि त्याच बळी गेलेल्यांचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत आणि डझनभर जखमी झाले आहेत अशी माहित समोर आली आहे. दहशतवाद्यांविरोधातील भारताच्या या कारवाईचे नाव आहे – ‘ऑपरेशन सिंदूर’. पहलगाममध्ये ज्या प्रकारे दहशतवाद्यांनी हल्ला केला, त्यात अनेक लोकांचे प्राण गेले. त्यापासून प्रेरित होऊन या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. आता प्रश्न असा आहे की ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व कोणाकडे होते? मध्यरात्री पाकिस्तानची लंका जाळणारे नेमके होतो तरी कोण ? असे अनेक सवाल लोकांच्या मनात आहेत.

खरंतर, ऑपरेशन सिंदूरची संपूर्ण कमांड एनएसए अजित डोभाल यांच्याकडे होती, त्यांना पंतप्रधान मोदींचे हनुमान म्हटले जाते. ऑपरेशन सिंदूर अजित डोवाल यांनीच केले. लाहोरपासून 409 किलोमीटर अंतरावर असलेल्या अजित डोभाल यांनी मध्यरात्री दहशतवाद्यांची लंका जाळली. ही कारवाई करण्यात एनएसए डोभाल यांनी विशेष पथकासह पुढाकार घेतला. ऑपरेशन सिंदूरमागील कथा फक्त हीच की, आपल्या शहीद सैनिकांचा आणि विधवा महिलांचा बदला घेण्यासाठी हा हल्ला झाला. ही कारवाई पूर्णपणे गुप्तचर यंत्रणेच्या माहितीवर आधारित होती.

कोणी लिहीली हल्ल्याची पटकथा ?

या हल्ल्याची पटकथा अजित डोवाल यांनी लिहिली होती. पंतप्रधान मोदींना सर्व माहिती दिली जात होती. जेव्हा पाकिस्तानमध्ये हल्ले होत होते, तेव्हा पंतप्रधान मोदी रात्रभर जागे होते, ते प्रत्येक क्षणाचे अपडेट्स घेत होते. महत्वाची गो्ट म्हणजे अजित डोवाल यांनी पंतप्रधान मोदींकडून ऑपरेशन सिंदूरसाठी आधीच मान्यता घेतली होती. ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे शोधण्यात एनटीआरओने महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर, सर्व ठिकाणे काळजीपूर्वक निवडण्यात आली आणि दुसऱ्या फेरीसाठी प्रत्येक ठिकाणाचे निरीक्षण करण्यात आले. मग फक्त दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच लक्ष्य करण्याचा निर्णय घेण्यात आला.

ऑपरेशन सिंदूरची इनसाइड स्टोरी

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये अराजकता कशी निर्माण करायची याचा अंतिम निर्णय एनएसए अजित डोभाल यांनी घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. सर्व काही अंतिम झाल्यानंतर, पंतप्रधान मोदींना सर्व माहिती देण्यात आली आणि एनएसएला पुढे जाण्यास अनुमति देण्यात आली. या हल्ल्याची माहिती खूप कमी लोकांना होती आणि यासाठी एक नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला होता. हाँ नियंत्रण कक्ष पूर्णपणे एनएसए आणि त्यांच्या टीमने हाताळला होता. अजित डोवाल स्वतः तिथे उपस्थित होते. पंतप्रधान मोदीही रात्रभर जागे राहून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा नाश पाहत होते.

ऑपरेशन सिंदूर नाव कोणी ठेवलं ?

कदाचित तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ऑपरेशन सिंदूर हे नाव स्वतः पंतप्रधान मोदींनी दिले आहे. दहशतवादाविरुद्धच्या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्याची सूचना पंतप्रधान मोदींनीच लष्कराला केली होती. यानंतर, लष्कराने पंतप्रधान मोदींनी दिलेल्या या नावाचा सल्ला स्वीकारला. पंतप्रधान मोदींच्या या सूचनेमागे एक संदेश होता. गेल्या महिन्यात, 22 एप्रिल 2025 रोजी, पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या सैनिकांच्या, विशेषतः लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या विधवा पत्नीच्या सिंदूरवरून हे नाव प्रेरित आहे. दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई करणे आणि हिमांशी नरवालसारख्या पीडितांना न्याय मिळवून देणे हे त्याचे उद्दिष्ट होते. भारताने पहलगामचा बदला घेत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, ज्यात 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.