Political Crisis in Pakistan : इम्रान खान यांच्या ‘किस्मत का फैसला’ रात्री होणार; अविश्वास ठरावावर रात्री 8 वाजता मतदान

Political Crisis in Pakistan : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारचा निर्णय आज रात्री लागणार आहे. आज रात्री 8 वाजता पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. त्यानंतर इम्रान खान यांचं सरकार राहणार की जाणार याचं चित्रं स्पष्ट होणार आहे.

Political Crisis in Pakistan : इम्रान खान यांच्या 'किस्मत का फैसला' रात्री होणार; अविश्वास ठरावावर रात्री 8 वाजता मतदान
इम्रान खान यांच्या 'किस्मत का फैसला' रात्री होणारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 09, 2022 | 3:51 PM

लाहोर: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांच्या सरकारचा निर्णय आज रात्री लागणार आहे. आज रात्री 8 वाजता पाकिस्तानच्या  (pakistan) नॅशनल असेंबलीत अविश्वास ठरावावर मतदान होणार आहे. त्यानंतर इम्रान खान यांचं सरकार राहणार की जाणार याचं चित्रं स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच इम्रान खान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री शाह महमूद कुरैशी (shah mehmood qureshi) यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही आज आहोत, उद्या नसू. लोकांनी निवडून आलेल्या सरकारविरोधात असं होतं असा कोणता देश आहे, असं कुरैशी म्हणाले. कुरैशी यांच्या या विधानाने इम्रान खान यांच्या सरकारचा सत्तेवरून पाय उतार होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दरम्यान, आज सरकारसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असूनही इम्रान खान हे असेंबलीत उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

आज रात्री 8 वाजता अविश्वास ठरावावर मतदान घेण्याबाबत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सहमती झाली आहे. त्यामुळे रात्री 8 वाजता अविश्वास ठरावावर मतदान होणार असून त्यानंतर पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांचं सरकार राहणार की विरोधकांचं सरकार येणार याचं चित्रं स्पष्ट होणार आहे.

इम्रान यांनी भारतात जावं

इम्रान खान यांनी काल देशाला संबोधित करताना भारताची स्तुती केली होती. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्या मरियम नवाज या भडकल्या आहेत. शेजारील देश जर इम्रान खान यांना एवढाच आवडत असेल तर त्यांनी सरळ त्या देशात जावं, असं मरियम यांनी म्हटलं आहे.

तीन तास भाषण करण्याचं फर्मान

दरम्यान जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, संसद सत्रामध्ये व्होटिंग घेण्यास जाणूनबुजून उशिर केला जात आहे. पीटीआयचे मंत्री आपले भाषण लांबवतील, असा दावाही केला जात आहे. हामिद मीर म्हणाले की, परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी ब्रेक नंतर त्यांचं भाषण सुरू ठेवतील. कमीत कमी तीन तास भाषण करावं, असा आदेश पंतप्रधानांनी आपल्या मंत्र्यांना दिल्याचा दावा, मीर यांनी केला आहे.

खासदारांच्या निलंबनाची शक्यता

मीर यांनी पीटीआयच्या संभाव्य योजनेबाबतही भाष्य केलं. पीटीआय अराजकता निर्माण करू शकते. विरोधकांना भडकवू शकते. जर असं काही झालं तर स्पीकर काही विरोधी सदस्यांना निलंबित करू शकतात. त्यामुळे पीटीआयला आपलं बहुमत सिद्ध करता येणार आहे, असा दावा मीर यांनी केला. दरम्यान, स्पीकर असद कैसर यांना आज कोणत्याही परिस्थितीत अविश्वास प्रस्तावावर मतदान घ्यावं लागणार आहे. नाही तर तो कोर्टाचा अवमान ठरेल, असंही सूत्रांनी सांगितलं.

संबंधित बातम्या:

Political Crisis in Pakistan : स्टिल कंपनीचा व्यापारी ते इम्रान खान यांची झोप उडवणारा नेता; पंतप्रधान पदाच्या शर्यतीतील शाहबाज शरीफ कोण?

Political Crisis in Pakistan : पाकिस्तानच्या स्पीकरकडून विरोधकांचा गेम, विदेशी षडयंत्राची चर्चा करण्यास सांगताच विरोधक भडकले

Political Crisis in Pakistan : तर भारतात चालते व्हा, नवाज शरीफच्या मुलीनं इम्रान खानला सुनावलं, इम्रान म्हणतात, भारतीय खुद्दार ‘कौम’ !

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.