13 व्या वर्षी अनाथ झाली तर 16 व्या वर्षी प्रेग्नंट, नंतर या तरुणीने शिक्षणाशिवाय उभारले तीन बिझनेस

मनुष्याला जीवनात प्रगती करायची असेल तर केवळ पुस्तकी शिक्षण कामाचे नसते.तर अनेक अनुभवातूनच माणूस जगायचे कसे हे शिकत असतो. अशाच पद्धतीने एका तरुणीने कोणतेही शिक्षण न घेता आयुष्यातील संकटांवर मात करत प्रगती केली आहे.

13 व्या वर्षी अनाथ झाली तर 16 व्या वर्षी प्रेग्नंट, नंतर या तरुणीने शिक्षणाशिवाय उभारले तीन बिझनेस
Follow us
| Updated on: Nov 13, 2024 | 2:46 PM

मनुष्याला प्रगती करायची असेल तर शिक्षणाची गरज लागत असते. परंतू जीवनात यशस्वी बनण्यासाठी केवळ शिक्षणाची नाही तर तुमच्यातील जिद्दीची देखील गरज असतो. त्यामुळे तुम्ही चांगल्या शाळेत शिकायला हवं हे काही गरजेचे नाही. तुम्हाला जीवनात काही बनायचे असेल तर शिक्षणाशिवाय केवळ अनुभवाच्या शिदोरीवर माणसं जीवनात यशस्वी होत असतात.आज आपण अशाच एका मुलीची कहाणी वाचणार आहोत.

सोन्याची खरी झळाली तापल्यावरच समजते. असेच काहीसे या मुलीच्या बाबतीत झाले आहे.या मुलीच्या वडीलांचा मृत्यू ती लहान असतानाच झाला. त्यानंतर तिला शाळा सोडून द्यावी लागली. त्यानंतर तिच्या आयुष्यात संकटेच संकटे आली.परंतू या मुलीने सर्व संकटातून तावून सुलाखून जीवन जगायला सुरुवात केली. आज ही मुलगी कोणत्याही पुस्तकी डिग्रीशिवाय लाखो रुपये कमवित आहे.आणि आपल्या चार मुलांचे चांगले पालन पोषण करीत आहे.

‘द सन’ च्या बातमीनुसार पेज ब्रुक नावाच्या या तरुणीच्या जीवनात संकटाची मालिकाच आली. ती तेरा वर्षांची असताना तिच्या वडीलांचा मृत्यू बाईक अपघातात झाला. आईशी वेगळी झाल्यानंतर ती 16 व्या वर्षी मॅकडोनल्ड मध्ये काम करु लागली आणि हॉस्टेलमध्ये राहू लागली.याच वेळी ती प्रेग्नंट राहीली. तिला मुलगा झाला. नंतर तिने दुसऱ्या मुलालाही जन्म दिला. आता तिला दोन मुलांचे संगोपन करण्यासाठी जादा पैशाची गरज होती. त्यामुळे ती दोन-दोन नोकरी करु लागली. पेज सांगते की तिच्याकडे साध्या वस्तू घेण्यासाठी देखील पैसे नसायचे.

हे सुद्धा वाचा

एका मशिनमुळे बिझनेसची आयडीया सुचली

तिला एक गिफ्ट कार्ड मिळाले होते. त्यातून तिला क्रिकट जॉय नावाची क्राफ्ट कटिंग मशीन मिळाली. तिने या मशिनने काय करतात हे इंटरनेटवर पाहीले. त्यानंतर तिला घर बसल्या पहिली ऑर्डर मिळाली. त्यानंतर तिने फेसबुकवर Behind The Trend नावाचे फेसबुक पेज बनवले. त्यातून तिला अनेक ऑर्डर मिळत गेल्या.आणि चांगले पैसे मिळू लागले. त्यानंतर Pinky Promises नावाची कन्सल्टंसी कंपनी देखील सुरु केली. पेज सांगते की आता तिला तीन मुले आणि तीन बिझनेस आहेत. ती आरामात लाखो रुपये कमवित आहे. ती आधी एका दिवसात 1000 रुपये कमवायची आता पाच लाख कमवित आहे.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.