कोरोनावर लस शोधल्याचा Oxford विद्यापीठाचा दावा, सप्टेंबर महिन्यात लस येण्याची शक्यता

ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापकांनी कोरोना लस बनवल्याचा दावा केला आहे (Vaccine on Corona Virus by Oxford).

कोरोनावर लस शोधल्याचा Oxford विद्यापीठाचा दावा, सप्टेंबर महिन्यात लस येण्याची शक्यता

लंडन : जगभरात कोरोना विषाणुचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. हा आकडा आता 22 लाखाहून अधिक झाला आहे. यात जवळपास 1 लाख 54 हजार लोकांना आपला प्राणही गमवावा लागला आहे. अशातच आता काहिसा आशेचा किरण दिसत आहे. ब्रिटनमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठातील प्राध्यापकांनी कोरोना लस बनवल्याचा दावा केला आहे (Vaccine on Corona Virus by Oxford).

आपल्या टीमने कोविड 19 म्हणजेच कोरोनावरील लस शोधल्याचा दावा ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटीचे प्राध्यापक सारा गिल्बर्ट यांनी केला आहे. ब्लूमबर्गने याबाबत वृत्त दिलं आहे. त्यांच्या दाव्यानुसार सप्टेंबरपर्यंत कोरोनावरील लशीचे 10 लाख डोस उपलब्ध होतील. गिल्बर्ट म्हणाले, “आमची टीम अशा आजारावर संशोधन करत होती जो आजार महामारीचं रुप धारण करु शकतो. या कोरोना लसला एक्स (X) असं नाव देण्यात आलं आहे. ही औषधाचं 12 वेळा परीक्षण करण्यात आलं आहे. औषधाचा रोग प्रतिकारक शक्तीवर चांगला परिणाम दिसून आला आहे. याची वैद्यकीय चाचणी देखील सुरु झाली आहे.”

विशेष म्हणजे या लसबाबत ऑक्सफोर्ड टीमला इतका विश्वास आहे की वैद्यकीय अहवाल येण्याआधीच त्यांनी याचं उत्पादन देखील सुरु केलं आहे. प्रोफेसर अँड्रिअन हिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमच्या टीमला लस उपलब्ध होण्यात कोणतीही दिरंगाई नको आहे. त्यामुळेच आम्ही धोका पत्करत या लसचं उत्पादन सुरु केलं आहे. प्रोफेसर हिल म्हणाले, “या लस उत्पादनात 7 उत्पादकांना सहभागी करण्यात आलं आहे. यात 3 ब्रिटन, 2 यूरोप, 1 चीन आणि एक भारतातील उत्पादक आहे. ब्रिटेनची नॅशनल इंस्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्च आणि द यूके रिसर्च अँड इनोवेशनने ही लस शोधणाऱ्या गिलबर्ट यांच्या टीमला 2.2 मिलियन पाउंडचं अनुदान दिलं आहे. ब्रिटेनमध्ये कोरोना व्हायरसमुळे आत्तापर्यंत14 हजारहून अधिक लोकांना आपला प्राण गमवावा लागला आहे.

संबंधित बातम्या :

पुण्याला कोरोनाचा विळखा, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 589 वर

मुंबईची धाकधूक वाढली, सातहून अतिगंभीर वार्डमध्ये प्रत्येकी 110 पेक्षा अधिक रुग्ण

चेंबूरमधील पीएल लोखंडे मार्ग कोरोनाचं हॉटस्पॉट, 34 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, 70 जण क्वारंटाईन

कराडमधील पहिला रुग्ण कोरोनामुक्त, रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात निरोप

Vaccine on Corona Virus by Oxford

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *