AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानात येड्याचा बाजार… युद्धविरामानंतर अशी मागणी की ज्याने जगात होतंय हसू; म्हणे, शरीफ आणि मुनीर यांना…

अमेरिकेने इराणविरुद्ध युद्धविराम जाहीर करताच, पाकिस्तानने स्वत:च स्वत:लाच याचं क्रेडिट देत पाठ थोपटून घेण्यास सुरूवात केली. एवढंच नव्हे तर अर्ध्यामुर्ध्या युद्धविरामानंतर पाकिस्तानमधून एका मागणीला जोर धरू लागला आहे, ते ऐकून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

पाकिस्तानात येड्याचा बाजार... युद्धविरामानंतर अशी मागणी की ज्याने जगात होतंय हसू; म्हणे, शरीफ आणि मुनीर यांना...
Shehbaz Sharif and Asim Munir Image Credit source: Getty Images
| Updated on: Apr 09, 2026 | 1:07 PM
Share

अख्ख्या जगात खळबळ माजवणाऱ्या इराण- अमेरिका इस्रायल युद्धामुळे सर्वांनाच झटके बसले होते. मात्र इराण आणि अमेरिका यांच्यातील हे युद्ध थांबवण्याचा, युद्धविरामाचा निर्णय काल जाहीर झाला. दोन्ही देशांनी यावर सहमती दर्शवली होती. एक दिवसापूर्वी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील अमेरिकी आणि इस्रायली हल्ले 15 दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा केली होती. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्या आवाहनानंतर आपण 15 दिवसांच्या शस्त्रसंधीबद्दल सहमती झाली असं ट्रम्प यांनी सांगितलं. मात्र युद्धविराम होताो ना होतो हे युद्ध थांबवण्याचं श्रेय पाकिस्तानने घेतलं.

हा युद्धविराम खरोखर किती टिकेल याबाबतल अजूनही अनेकांच्या मनात शंकाच आहे. मात्र असं असतनाही पाकिस्तानातून एका मागणीला जोर चढू लागला आहे. पाकिस्तानी माध्यमांमध्ये शहबाज आणि मुनीरच्या बढाईची लाट सुरू झाली आहे,त्यातच पाकिस्तानने आता एक अशी मागणी केली आहे, जी ऐकून तुम्हाला हसू येईल. खरंतर शस्त्रसंधी जाहीर झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी ती मोडण्याचा धोका निर्माण झाला असतानाही, पाकिस्तानात या शस्त्रसंधीसाठी नोबेल शांतता पुरस्काराची मागणी करण्यात आली आहे. पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी आणि तेथील काही संघटनांनी ही मागणी केली आहे, ज्यावरू आता जगभरात पाकचं हसू होत आहे.

ट्रम्प यांनी केली होती घोषणा

भारतीय वेळेनुसार, बुधवारी पहाटे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात युद्धविरामाची घोषणा केली. इराणने 10 मुद् समोर ठेवले असून ते वाटाघाटींसाठी एक मजबूत आधार ठरू शकतात आणि दोन आठवड्यांत अंतिम करार होऊ शकेल अशी आशा ट्रम्प यांनी व्यक्त केली होती. या युद्धविरामाचं श्रेय पाकने लगेच घेतलं आणि स्वत:ची पाठ थोपटून घेतली. एवढंच नव्हे तर आता, पाकमधून शाहबाज शरीफ आणि मुनीरना नोबेल देण्याची मागणी केली जात आहे.

कोणी मागितलं नोबेल ?

कराची चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आणि पाकिस्तानी माध्यमांच्या विविध विभागांनी, बुधवारी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांना नोबेल शांतता पुरस्कार प्रदान करण्याची मागणी केली आहे. खरंतर काल युद्धविरामाची घोषणा करताना ट्रम्प यांनी या घोषणेमध्ये शहबाज शरीफ आणि मुनीर यांचाही उल्लेख केला.

त्यानंतर पाकिस्तानी माध्यमांनी शरीफ आणि मुनीर यांचे गोडवे गायला सुरूवात केली. या शस्त्रसंधीमध्ये पाकिस्तानची मध्यस्थी महत्त्वाची होती आणि यासाठी शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे हा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानी माध्यमं उपस्थित करत आहेत.

पाकिस्तानी टीव्ही चॅनल एआरवायवरील एका चर्चेदरम्यान, पॅनेल सदस्यांनी या शस्त्रसंधीला पाकिस्तानचा एक राजनैतिक विजय म्हटलं. याच चर्चेदरम्यान एका पॅनेलिस्टन म्हणाला की, “आपल्या नेतृत्वाने केलेल्या सर्व कामानंतर, मी म्हणेन की आपले पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि आसिम मुनीर हे नोबेल शांतता पुरस्कारासाठी सर्वात योग्य उमेदवार आहेत. खरं तर, जगात फक्त या दोनच व्यक्तींना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा.”, असं त्याने नमूद केलं. त्या पॅनेलिस्टने ट्रम्प यांच्या पुरस्कारासाठीच्या नामांकनाचीही आठवण करून दिली.

जागतिक नेत्यांनी आता शहबाज शरीफ आणि आसिम मुनीर यांना (नोबेल पुरस्कारासाठी) नॉमिनेट करावे, असंही तो पॅनलिस्ट म्हणाला. एकीकडे या शस्त्रसंधीचं भवितव्यच अनिश्चिततेच्या भोवऱ्यात असतानाच. पाक मात्र आपल्या नेत्यांसाठी नोबेलचं स्वप्न पाहण्यात व्यस्त आहे.

एकीकडे ही चर्चा आहे. पण शस्त्रसंधीच्या दुसऱ्याच दिवशी ट्रम्प यांनी जाहीर केलं की त्यांचं सैन्य सज्ज आहे. शस्त्रसंधीवरून राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना त्यांच्याच देशात विरोधाचा सामना करावा लागत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शुक्रवारी पाकिस्तानात चर्चा होणार आहे, परंतु या चर्चेबदद्ल अजूनही अनिश्चितता आहे.

Follow Us
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; राऊतांना...
कुंभमेळ्याला बदनाम करणे थांबवा, अन्यथा नाशिककर चोप देतील; बड्या नेत्याचा राऊतांना इशारा
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी गृहमंत्री अमित शाह यांना बांधली राखी, पहा खास क्षणाचा व्हिडीओ
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात...नेमकं प्रकरण काय?
ममता बॅनर्जींवर थेट गुन्हा दाखल, कोर्टाच्या आदेशात... नेमकं प्रकरण काय?