AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pakistan-Iran : इराणच्या लष्करी विमानांना पार्किंग दिली, अमेरिकेसोबत डबल गेमच्या आरोपावर अखेर पाकिस्तानने दिलं उत्तर

Pakistan-Iran : पाकिस्तानच्या नूर खान एअर बेसवर इराणची लष्करी विमान उभी असल्याचं वृत्त CBS न्यूजने दिलं. त्यानंतर एकच खळबळ उडाली. हे अमेरिकेच्या पाठित खंजीर खुपसण्यासारखं आहे. त्यावर आता पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सविस्तर आपली भूमिका मांडली आहे.

Pakistan-Iran : इराणच्या लष्करी विमानांना पार्किंग दिली, अमेरिकेसोबत डबल गेमच्या आरोपावर अखेर पाकिस्तानने दिलं उत्तर
Iranian military aircraft IssueImage Credit source: Getty Images
| Updated on: May 12, 2026 | 12:54 PM
Share

पाकिस्तानचा विश्वासघातकी चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. अमेरिका-इराणमध्ये मध्यस्थीचे नाटक करणाऱ्या पाकिस्तानने इराणच्या लष्करी विमानांना आपल्या इथे आसरा दिल्याचं समोर आलं आहे. पाकिस्तानच्या नूर खान एअर बेसवर इराणची लष्करी विमान उभी असल्याचं आज सकाळी वृत्त आलं. अमेरिका-इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये नुकसान होऊ नये म्हणून पाकिस्तानने इराणच्या लष्करी विमानांना आपल्या इथे पार्किंग दिली. ही बातमी बाहेर आल्यानंतर पाकिस्तानने हे वृत्त फेटाळून लावलं आहे. “CBS चं वृत्त चुकीचं आहे. ही बातमी दिशाभूल करणारी आणि खळबळ उडवून देणारी आहे. आम्ही आमच्या इथे कुठल्याही इराणच्या लष्करी विमानाला पार्किंगची परवानगी दिली नाही” असं आता पाकिस्तानने म्हटलं आहे. हे वृत्त समोर आल्यापासून अमेरिकेत संतापाची लाट उसळली आहे. अनेक अमेरिकी सिनेटर्सनी पाकिस्तानच्या या दुटप्पी भूमिकेवर कडाडून टीका केली आहे. हे पाठित खंजीर खुपसण्यासारखं आहे.

“प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांच महत्व कमी करणं हा या अशा बातम्यांमागे उद्देश आहे” असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. “नूर खान एअरबेसवर इराणची लष्करी विमानं असल्याचं CBS न्यूजच वृत्त आम्ही फेटाळून लावत आहोत. ही पूर्णपणे दिशाभूल करणारी बातमी आहे. काहीही अंदाज बांधून दृष्टीकोन निर्माण करण्याचा आणि प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी सुरु असलेल्या प्रयत्नांच महत्व कमी करणं हा उद्देश यामागे आहे” असं पाकिस्तानने म्हटलं आहे.

पाकिस्तानने काय मान्य केलं?

सीजफायरची चर्चा सुरु असताना इस्लामाबादमध्ये पहिल्या राऊंडच्या बोलणीसाठी अमेरिकन आणि इराणी विमानं पाकिस्तानात आली होती असं पाकिस्तानी मंत्रालयाने म्हटलं आहे. डिप्लोमॅट, सुरक्षा रक्षक आणि प्रशासकीय स्टाफ यांच्यासाठी ही विमान वापरण्यात आलेली. पुढच्या फेरीच्या काही चर्चा होतील म्हणून काही विमानं आणि सपोर्ट स्टाफ पाकिस्तानात असल्याचं मंत्रालयाने म्हटलं आहे. अधिकृत चर्चा अजून सुरु झालेल्या नाहीत. पण वरिष्ठ पातळीवर कूटनितीक आदान-प्रदान सुरु आहे. सीजफायरच्यावेळी पाकिस्तानात आलेलं इराणचं विमान अजूनही तिथे थांबलं असल्याचं पाकिस्तानने मान्य केलं. लष्करी विमानांसाठी अशी कुठलीही व्यवस्था केलेली नाही असं पाकिस्तानकडून सांगण्यात आलं.

त्यातून काही तोडगा निघाला नव्हता

अमेरिका-इराण युद्धात मागच्या महिन्यात सीजफायरची घोषणा झाल्यानंतर पाकिस्तानात पहिल्या फेरीची चर्चा झाली होती. पण त्यातून काही तोडगा निघाला नव्हता. अमेरिका-इराण अजूनही आपपाल्या भूमिकेवर ठाम आहेत. हा सीजफायर कुठल्याही क्षणी तुटेल आणि युद्धाला सुरुवात होईल अशी स्थिती आहे.

Follow Us
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा